सहजच.. थोडं मनातलं (लेख) : “प्रेम”

“मम्मा, मला बघून हे भुभु एवढं उड्या का मारतं??”

“कारण तू त्या भुभुला खाऊ दिलास.. त्याचे लाड केलेस.. ”

“पण मग त्याला सगळेच खायला देत असतील.. पण तो कधी त्यांना बघून उड्या नाही मारत.. असं का???”

विराजच्या ह्या निरागस प्रश्नांवर आई हसली. आणि म्हणाली…
“त्याला प्रेम देणारा तू पहिला असशील.. अशा रस्त्यावरच्या भुभुला सगळे हाडतुड करतात.. कोणी जवळ घेत नाही. आणि तू त्याला जवळ घेतलेस… खायला दिलेस.. प्रेम दिलेस… आणि त्याला त्याचीच गरज होती. म्हणून तो तुला बघून उड्या मारतो.”

आईचं बोलणं ऐकून विराजला खुप छान वाटलं. आपल्या मुळे एखाद्याची गरज पूर्ण होतेय.. कोणाला तरी प्रेम मिळतंय.. त्याचं आयुष्य छान होतंय… किमान सुखाचं होतंय.. हे पाहुन त्याला समाधान मिळालं.

अनेकदा आपण ही इतरांच्या गरजा भागाव्या.. त्यांना प्रेम मिळावं.. असं वागायला हवं.
आपल्या जरासं प्रेम देण्याने एखाद्या व्यक्तिची किंवा प्राण्याची मानसिक गरज पूर्ण होऊ शकते. त्यामुळे आपण नेहमी असं प्रेम वाटावं.

– ©के. एस. अनु