सहजच.. थोडं मनातलं (लेख) : “सोबत”

शिरीषला संगीता नेहमी सोबत हवी असायची. म्हणून तो प्रत्येक ठिकाणी तिला घेऊन फिरायचा.
लव मॅरेज केल्या मुळे दोघे ही सुखात होते. संगीताही प्रत्येक पिकनिकला, फिरायला.. सगळीकडे शिरीष सोबत जायची. अगदी बाहेरगावी ऑफिसचं काम असेल तरी दोघे सोबत असायचे.

संगीताला लहानपणा पासून फिरायला मिळालं नाही.. म्हणून लग्ना नंतर शिरीष सोबत जाणं तिला फार आवडायचं. पण सवय नसल्यामुळे आधी अंगदुखी… मग ताप.. आणि मग सारखं अजारपण सुरु झालं. संगीता वरचेवर आजारी राहु लागली. त्यामुळे तिचं आणि शिरीषचं सोबत राहणं फार कमी झालं. फिरणं कमी झालं. कमरेच्या दुखण्याने तिची हालचाल कमी झाली.

ह्या उलट जर दोघांनी थोडा धीर धरून.. संगीताला प्रवास झेपतोय की नाही हे पाहुन जर आवड जोपासली असती.. तर दोघंही एकत्र फिरू शकले असते.
वर्षातुन किंवा सहा महिन्यातुन एकदा फिरायला जाऊच शकले असते. पण ती गोष्ट धीराने, संयमाने न करता अधाशा सारखी केल्या मुळे संगीता पुन्हा तो आनंद लुटु शकली नाही.

प्रत्येक वेळी सोबत ही शरीरानेच असावी असे नाही. मनाने ही एकत्र असणे खुप महत्वाचे असते.
त्यामुळे जमेल तेवढं करायचं.. पण आपलं लिमिट मात्र आपणच लक्षात ठेवायचं.

-©के. एस. अनु