राशी भविष्य

मासिक राशी भविष्य | जानेवारी 2021

1

मेष

वर्ष २०२१ चा पहिला महिना आपणास अत्यंत चांगला जाणारा आहे. महिन्याच्या सुरवातीपासूनच आपली प्राप्ती उत्तम राहिल्याने आपल्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. आपले खर्च नियंत्रित राहिल्याने आपल्या आर्थिक योजनांची अंमल बजावणी करण्यात आपण यशस्वी व्हाल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती मन लावून कामे करतील. आपले ज्ञान, समजूतदारपणा व दूरदर्शीपणा ह्यांचा परिचय सुद्धा होईल व त्यास प्रशंसित सुद्धा केले जाईल. व्यापारीवर्गास आपल्या समजूतदारपणामुळे व्यापारात प्रगती साधण्याची संधी मिळेल. काही जुन्या व अनुभवी लोकांचे सहकार्य आपणास मिळू शकते. आपणास आपल्या प्रणयी जीवनाचा आनंद उपभोगण्याची संधी मिळेल. आपल्या प्रियव्यक्तीसह दूरवरच्या प्रवासास जाण्याची संधी सुद्धा लाभेल. आपण एकमेकांची भेट घेऊन नात्याचा गंभीरपणे विचार कराल. आपण प्रियव्यक्तीस विवाहाचा प्रस्ताव सुद्धा देऊ शकाल. विवाहितांना मात्र कामाच्या भारामुळे वैवाहिक जीवनाचा आनंद फारसा उपभोगता येणार नाही. त्यासाठी मुद्दाम वेळ काढून जोडीदाराचा सहवास मिळविण्याचा प्रयत्न करावा लागेल. कुटुंबियांचे संपूर्ण सहकार्य मिळवू शकाल. विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षकांकडून उपयुक्त असा सल्ला मिळू शकेल. ह्या महिन्याचा दुसरा व चौथा आठवडा प्रवासासाठी अनुकूल आहे.

2

वृषभ

हा महिना आपणास मध्यम फले देणारा आहे. आपल्या प्रकृतीत सतत चढ - उतार येऊन मोठा त्रास होण्याच्या शक्यतेमुळे आपणास आपल्या प्रकृतीची थोडी काळजी घ्यावी लागेल. खर्चात वाढ होईल, जे नियंत्रित करण्यासाठी आपणास प्रयत्न करावे लागतील. प्राप्तीत मात्र वाढ होईल व त्यामुळे आपण आनंदित व्हाल. नोकरीत सहकाऱ्यांचे अपेक्षित सहकार्य मिळू शकेल. व्यापारीवर्ग ह्या महिन्यात चांगला नफा मिळण्याची अपेक्षा बाळगू शकतील. विवाहितांना प्रेमालापासाठी वेळ मिळाल्यामुळे वैवाहिक जीवनातील सुखद क्षणांचा आनंद उपभोगता येईल. प्रेमी युगलांना आपल्या नाते संबंधाशी संबंधित एखादी गोड बातमी मिळू शकेल. विद्यार्थ्यांचा अभ्यास चांगला होईल. प्रवासासाठी महिन्याचा दुसरा व चौथा आठवडा अनुकूल आहे.

3

मिथुन

वर्षाचा पहिला महिना आपणास मोठे परिणाम मिळवून देईल. आपली प्रकृती उत्तम राहिल्याने आपण सर्व कामे पूर्ण शक्तीने करू शकाल. त्यामुळे कामात यश सहजगत्या प्राप्त होईल. आपले कष्ट कोठेही कमी पडणार नाहीत. आपल्या ज्ञानात भर पडेल. बारीक सारीक गोष्टी सुद्धा आपण सहजपणे समजू शकाल. त्याचा फायदा आपणास आपल्या व्यापारात झाल्याने प्राप्तीत वाढ होऊ शकेल. नोकरीत वरिष्ठांची कृपा होईल. वरिष्ठ आपल्या कामाने प्रभावित होतील. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुरळीत चालून नात्यातील वीण अधिक घट्ट होईल. प्रेमी युगलांसाठी हा महिना प्रेमालाप करण्यास अनुकूल असल्याने त्यांचे संबंध अधिक दृढ होतील. विद्यार्थ्यांना एकाग्रता होण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील. आपण जर एकाग्रता साधण्यात यशस्वी झालात तर अभ्यासात नवीन काही गोष्टी शिकण्यास मिळून आपली वैचारिक शक्ती प्रभावित होईल व आपल्या प्रगतीस ती मदतरूप ठरेल. प्रवासासाठी महिन्याचा दुसरा व चौथा आठवडा अनुकूल आहे.

4

कर्क

हा महिना आपणास चांगला जाणारा आहे. महिन्याच्या सुरवाती पासूनच आपणास धनप्राप्ती होऊ लागेल व त्यामुळे आपली आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल. तसेच आपण आपली सर्व कामे नियोजित वेळेत पूर्ण करू शकाल. आवश्यक कामासाठी आपल्या खर्चात वाढ झाल्याचा आपणास काहीच त्रास होणार नाही. आपल्या ज्ञानाचा आपणास खूपच मोठा फायदा होईल. आपले विचार आपल्या प्रगतीस कारणीभूत ठरतील. कुटुंबियांचे अपेक्षित सहकार्य आपण मिळवू शकाल. कुटुंबात एखादा नवीन कार्यक्रम किंवा एखाद्याचा विवाह ठरू शकतो. ह्या महिन्यात विवाहित व्यक्ती वैवाहिक जीवनाचा मनसोक्त आनंद उपभोगू शकतील. प्रणयी जीवनासाठी मात्र ग्रहमान अनुकूल नसल्याने त्यात काही तणाव निर्माण होण्याची शक्यता असून आपणास सावध राहावे लागेल. कटुता वाढू न देता संवाद साधून तडजोड करावी. नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना अनुकूल असून आपल्या कामात आपण प्रगती साधू शकाल. आपल्या कामाची प्रशंसा होईल. व्यापारीवर्गास मोठे लाभ होतील. आपणास प्रसिद्धी मिळू शकेल. आपले आरोग्य उत्तम राहील. प्रवासासाठी महिन्याचा दुसरा आठवडा जास्त अनुकूल आहे.

5

सिंह

हा महिना आपल्यासाठी अत्यंत अनुकूल असा आहे. आव्हानांचा सामना आपण करू शकाल. कोणत्याही समस्येने आपण विचलित होणार नाही. त्यामुळेच आपले विजयी स्वरूप प्रगट होईल. आपले आरोग्य काहीसे कमकुवत होईल. आपणास ताप किंवा डोकेदुखीचा त्रास किंवा एखादी दुखापत होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना आपल्या परिश्रमाचे यथोचित फल मिळेल. तसेच शासनाकडून एखादा मोठा लाभ सुद्धा मिळू शकेल. व्यापारीवर्गास व्यापारात वाढ करण्यासाठी काही नवीन योजना आखाव्या लागतील. कुटुंबात एकोपा राहील. कुटुंबातील एखाद्या वडीलधाऱ्या व्यक्तीच्या प्रकृतीमुळे चिंता निर्माण होईल. आपण भावंडांच्या सहवासात एखाद्या जुन्या आठवणीत रमून जाल किंवा पूर्वजांची वास्तू किंवा जमीन - जुमला बघण्यास जाऊ शकाल. प्रणयी जीवन अधिक दृढ होईल. आपली प्रिय व्यक्ती एखाद्या मंदिरात जाण्याचा हट्ट करण्याची शक्यता सुद्धा आहे. विवाहित लोकांना वैवाहिक जीवनाचा आनंद सहजपणे उपभोगता येईल. वैवाहिक जोडीदार खुश होईल. कौटुंबिक स्थिती आपणास अनुकूल असेल. ह्या महिन्याच्या सुरवातीस व दुसऱ्या आठवड्यात आपण एखाद्या प्रवासास जाऊ शकाल.

6

कन्या

वर्ष २०२१ चा हा पहिला महिना आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा ठरणारा आहे. ह्या महिन्यात आपणास खूपच चांगले परिणाम मिळतील. आपल्या प्राप्तीत वाढ झाल्याने आर्थिक दृष्ट्या आपण मजबूत व्हाल व कुटुंबात एखाद्या धार्मिक व सांस्कृतिक कार्याचे आयोजन सुद्धा करू शकाल. लहान - सहान प्रवासाने आपण आनंदित व हर्षित व्हाल. आपल्या पूर्वजांच्या घरात वास्तव्य करण्याचा आनंद लुटू शकाल. आपण जर लांब राहत असाल तर आपल्या जुन्या घरी जाण्याची संधी मिळेल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना खूपच चांगला असून कामाच्या बाबतीत त्यांना चांगले परिणाम मिळू शकतील. कष्टाचे चीज होईल. व्यापारी वर्गास घाईगर्दी टाळून कामे करावी लागतील. त्यामुळे त्यांना चांगले परिणाम मिळू शकतील. ह्या महिन्यात आपले आरोग्य उत्तम राहील. प्रणयी जीवनात काही गैरसमज होऊन नातेसंबंधात तणाव निर्माण होण्याच्या शक्यतेमुळे सावध राहावे लागेल. वैवाहिक जीवनात व्यावहारिकता अधिक व भावना कमी अशी परिस्थिती झाल्याने काहीसा त्रास होऊ शकतो. महिन्याच्या मधल्या दिवसात प्रवासाच्या संधी चालून येतील. ह्या महिन्यात आपले आरोग्य उत्तम राहील.

7

तूळ

वर्षाचा पहिलाच महिना आपल्यासाठी मध्यम फले देणारा आहे. सुरवाती पासूनच आपल्या प्राप्तीत वाढ होत राहिल्याने आपणास ह्या महिन्यात पैश्यांची कमतरता भासणार नाही. खर्चात कपात झाल्याने आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल व त्यामुळे मना पासून आपण समाधानी व्हाल. ह्या महिन्यात स्थिती बहुतांशी ठीक राहील. आपल्या प्रकृतीत सुधारणा होऊन जुन्या समस्येतून सुटका होईल. वैवाहिक जीवनात काही चांगल्या गोष्टी घडतील. कुटुंबात एखाद्या लहान व्यक्तिचे आगमन संभवते किंवा एखाद्याचा विवाह ठरू शकतो. प्रेमी युगलांना एखाद्या पौराणिक मंदिर असलेल्या किंवा पुरातत्त्वाच्या दृष्टीने महत्व असलेल्या ठिकाणी जाण्याची संधी मिळेल. त्यामुळे त्यांच्या काही जुन्या आठवणी ताज्या होतील. नोकरी करणाऱ्यांना चांगले परिणाम मिळू शकतील व त्यामुळे आपल्या कामात ते अधिक लक्ष केंद्रित करतील. वरिष्ठ सुद्धा त्यांच्यावर खुश होतील. व्यापारी वर्गासाठी हा महिना अधिक चांगला आहे. त्यांच्या योजना त्यांच्यासाठी फलद्रुप होतील. प्रवासासाठी महिन्याचा दुसरा आठवडा जास्त अनुकूल आहे. विद्यार्थ्यांना चांगले परिणाम मिळतील, तसेच त्यांचे अभ्यासातील एकाग्रचित्त उत्तम होईल.

8

वृश्चिक

हा महिना आपल्यासाठी अत्यंत अनुकूल आहे. आपणास कार्यात यश प्राप्त होईल व त्यामुळे मन हर्षित होईल. आपण अत्यंत जलद गतीने कामे कराल व प्रत्येक कामासाठी आपले शत - प्रतिशत योगदान द्याल. ह्या सर्वांमुळे आपला हा महिना खूपच चांगला जाईल. महिन्याच्या सुरवातीसच आपल्या प्राप्तीत वाढ होत असल्याचे दिसून येईल. महिनाभर छोटे - मोठे खर्च झाले तरी चिंतीत होण्याची गरज नाही. आपणास समाजात मान - सन्मान तर कार्यात यश सुद्धा मिळेल. नशिबाची चांगली साथ मिळेल, व त्यामुळे कमी श्रमात अधिक कामे होऊ शकतील. कौटुंबिक वातावरणात चढ - उतार अनुभवास येतील. नोकरी करणाऱ्या जातकांना आपल्या परिश्रमाचे यथोचित फल मिळेल तर व्यापारी वर्गास विदेशी संपर्कातून मोठा फायदा होऊ शकेल. लोखंड व फर्निचरच्या व्यवसायात विशेष लाभ होईल. वैवाहिक जीवनात काहीशी कटुता अनुभवास येईल. आपले वैवाहिक संबंध दृढ करण्यासाठी आपणास अधिक प्रयत्न करावे लागतील. प्रणयी जीवनात काही कारणाने वाद होऊन तणाव निर्माण होण्याच्या शक्यतेमुळे सावध राहावे लागेल. आपण घरासाठी एखादे उपकरण घ्याल, परंतु ते आपल्या पसंतीचे नसल्याने आपण काहीसे नाराज व्हाल. प्रवासासाठी महिन्याचा दुसरा आठवडा जास्त अनुकूल आहे.

9

धनु

हा महिना आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. ह्या दरम्यान आपणास नात्यात, कार्यशैलीत व आर्थिक क्षेत्रात विशेष बदल होताना दिसणार नाही. असे असले तरी ग्रहांच्या अनुकूलतेमुळे नोकरी करणाऱ्या व्यक्तींना काही लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीत पदोन्नती संभवते. महिन्याच्या सुरवातीस वरिष्ठांशी दुरावा वाढण्याची शक्यता आहे. महिन्याच्या अखेर पर्यंत आपण आपल्या व्यावसायिक संबंधांवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करू लागाल. ह्या दरम्यान आपणास व्यवसायात किंवा व्यावसायिक जीवनात उपयोगी पडतील अशा काही लोकांच्या सहवासात आपण याल. सामाजिक व आर्थिक क्षेत्रात काही लाभ संभवतो. हा महिना संबंधांसाठी अतिशय अनुकूल असल्याचे दिसत आहे. ह्या महिन्यात आपल्या प्रिय व्यक्तीच्या सहवासात आपण काही सुखद क्षण घालवू शकाल. एखाद्या धार्मिक किंवा सामाजिक प्रवासासाठी खर्च होण्याची शक्यता आहे. ह्या दरम्यान आपणास कायदेशीर कार्यवाही पासून दूर राहण्यासाठी प्रयत्नशील राहावे लागेल. महिन्याच्या अखेरीस काही आर्थिक लाभ संभवतात. असे असले तरी पैतृक संपत्तीच्या बाबतीत काही अडथळा येऊ शकतो. कोर्ट - कचेरीसाठी पैसा खर्च होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला आपणास देण्यात येत आहे. विशेषतः महिन्याच्या सुरवातीस डोळ्यांशी संबंधित एखादी समस्या उदभवण्याची शक्यता आहे. आपणास जर रक्तदाब किंवा सांधेदुखीचा त्रास असेल तर आपण अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

10

मकर

हा महिना आपणास अनुकूल असणार आहे. आपला आत्मविश्वास वाढेल. आपण सर्व कामे परिश्रमपूर्वक पूर्णत्वास न्याल. त्यामुळे आपणास प्रत्येक कार्यात यश प्राप्त होईल व एक यशस्वी व्यक्ती म्हणून आपली प्रतिमा निर्माण होईल. वैवाहिक जीवनात समजूतदारपणा राहील. प्रणयी जीवनात मात्र काही समस्या निर्माण होऊन प्रिय व्यक्तीशी काही वाद होण्याची शक्यता आहे. नोकरीत चढ - उतारांना सामोरे जावे लागेल, तेव्हा आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावे. व्यापारी वर्गासाठी हा महिना खूपच आशादायी आहे. प्राप्तीच्या बाबतीत आपण नशीबवान ठराल. आपल्या प्राप्तीत भरघोस वाढ होईल. विद्यार्थ्यांना आपल्या परिश्रमाचे यथोचित फल मिळेल. एखाद्या शासकीय परीक्षेसाठी त्यांची निवड होऊ शकते. प्रकृती चांगली राहणार असल्याने ह्या महिन्यात आरोग्य विषयक काही त्रास होणार नसला तरी बाहेरील पदार्थ टाळणे हितावह होईल. आपल्या प्रत्येक कामात कुटुंबियांचे पूर्ण सहकार्य आपणास मिळू शकेल. प्रवासासाठी महिन्याचा पहिला व दुसरा आठवडा खूपच अनुकूल आहे.

11

कुंभ

हा महिना आपल्यासाठी अत्यंत अनुकूल आहे. आपण एक प्रभावशाली व्यक्तीच्या रूपात पुढे याल. आपल्या सभोवताली लोकांचा गराडा पडून ते आपले अनुकरण करू लागतील. आपल्या शब्दांना एक वजन असेल व त्यामुळे आपली लोकप्रियता सुद्धा वाढेल. आपल्या खर्चात वाढ झाल्यामुळे प्राप्तीत वाढ करण्याचा विचार आपणास करावा लागेल. आपलीच काही माणसे आपणास त्रास देण्याचा प्रयत्न करतील. तेव्हा सतर्क राहावे लागेल. आपल्या प्राप्तीत हळू हळू वाढ होईल. त्यासाठी आपणास प्रयत्नशील राहावे लागेल. नोकरी करणाऱ्यांची बदली संभवते. व्यापारी वर्गासाठी हा महिना खूपच चांगला असून व्यापारातील नफ्याचे प्रमाण वाढते राहील. हा महिना प्रणयी जीवनासाठी सुद्धा चांगला आहे. आपण आपल्या प्रिय व्यक्तीस एखादी सुंदर भेटवस्तू देऊन आपले संबंध अधिक वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न कराल. वैवाहिक जीवनातील जवळीक वाढेल. ह्या महिन्यात आपले आरोग्य उत्तम राहिल्याने प्रकृती विषयक काही त्रास होणार नाही. प्रवासासाठी महिन्याचे सुरवातीचे व अखेरचे तीन दिवस अनुकूल आहेत. आपण एखाद्या मोठ्या संकटात सापडण्याची शक्यता असल्याने कायद्याच्या दृष्टीने निषेधात्मक असलेल्या कार्यात गुंतण्या पासून दूर राहावे.

12

मीन

ह्या महिन्याची सुरवात आपल्यासाठी खूपच चांगली होईल. आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर अनेक योजनांना आपण यशस्वी करू शकाल व त्यामुळे आपली स्थिती अधिक बलवान होईल. नोकरी करणाऱ्या जातकांना इतरांना मदत करण्याचा व कार्यरत राहण्याचा आनंद उपभोगता येईल व त्यामुळे काही लाभ पदरी पाडून घेता येतील. त्यांची प्रशंसा सुद्धा केली जाईल. मात्र, व्यापारात काही अडचणी निर्माण होण्याच्या शक्यतेमुळे व्यापारी वर्गाला थोडे सावध राहावे लागेल. ह्या महिन्यात प्राप्तीत वाढ झाली तरी, खर्चात सुद्धा वाढ होणार असल्याने प्राप्तीतील वाढ दिसून येणार नाही. ह्या उलट आर्थिक बाबतीत चढ - उतार होत असल्याची जाणीव होईल. विद्यार्थ्यांना हा महिना अनुकूल असून त्यांना मनोवांच्छित फलप्राप्ती होईल. कौटुंबिक वातावरणात आनंद पसरेल. आपण कुटुंब व कुटुंबीयांकडे लक्ष देऊ शकाल, मात्र कामाच्या व्यस्ततेमुळे काही जवाबदाऱ्या आपण घेऊ शकणार नाही. वैवाहिक जीवनात प्रेम व स्नेह वृद्धिंगत होईल. आपला वैवाहिक जोडीदार, कुटुंबियांच्या भेटीस जाऊ शकेल. ह्या महिन्यात आपले आरोग्य उत्तम राहील. आपली शारीरिक ऊर्जा चांगली राहिल्यामुळे आपणास निरोगीपणा जाणवेल. असे असले तरी आहारातील शिस्त आपणास पाळावी लागेल. महिन्याचा शेवटचा आठवडा वैवाहिक जोडीदारासह बाहेर फिरावयास जाण्यासाठी अनुकूल असून तसे केल्याने आपल्या संबंधातील जवळीक वाढेल.