महायुतीचे सर्व उमेदवार निवडून आणणारच : सुनील तटकरे

रोहा | केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना रायगडमध्ये काही प्रकल्प प्रस्तावित आहेत. यामुळे येथील तरुणांच्या हाताला काम मिळणार आहे. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येणार आहेच, या सरकारमध्ये अलिबाग मतदारसंघातून महेंद्र दळवी यांच्यासह महायुतीच्या सर्वच उमेदवारांना निवडून आणण्याची माझी जबाबदारी असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी केले.

अलिबाग-मुरुड मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार महेंद्र दळवी यांच्या प्रचाराची सभा रोहा तालुक्यातील चणेरा येथे घेण्यात आली. या सभेला लोकांची मोठी उपस्थिती पहायला मिळाली. यावेळी खासदार तटकरे यांनी अलिबाग-मुरुड मतदार संघातील अनेक विकास कामे आ.महेंद्र दळवी यांच्या माध्यमातून झालेली आहेत. त्यामुळे महेंद्रशेठ तुम्ही निश्चिंत रहा, ५० हजारपेक्षा मताधिक्याने तुम्ही निवडून याल, असा विश्वास त्यांनी आहे.

राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आणण्यासाठी अलिबाग मुरुड मतदारसंघात महेंद्र दळवी, पेण विधानसभा संघात भाजपचे रविंद्र पाटील, महाड पोलादपूर मतदार संघात भरत गोगावले, श्रीवर्धन मतदारसंघात अदिती तटकरे, दापोली मतदारसंघात योगेश कदम या सर्वांना निवडून आणण्याची जबाबदारी माझी आहे, असे तटकरे म्हणाले. राज्यात लेक लाडकी योजना, लाडकी बहीण योजना, शेतकर्‍यांसाठी लाडका भाऊ अशा अनेक योजना सर्व घटकांसाठी गेल्या अडीच वर्षात महायुती सरकारने राबविल्या.

परंतु दुर्दैवाने महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी महिलांसाठी लाडकी योजनेच्या विरोधात कोर्टात धाव घेतली.परंतु कोर्टात याचिका का टिकू शकली नाही. त्यामुळे विरोधक येतील, नरेटिव्ह पसरवण्यासाठी प्रयत्न करतील. एकीकडे योजनेला विरोध करायचा तर दुसरीकडे आमचे सरकार आले तर योजनेत वाढ करून देऊ, अशी संभ्रमाची भूमिका लोकांमध्ये त्यांनी ठेवली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासाची घोडदौड सुरू राहण्यासाठी, महिलांच्या रोजगारासाठी वेगवेगळी साधने उभी करायची आहेत.

त्यामुळे महायुतीच्या पाठीमागे सर्वांनी ठामपणे उभे रहावे, असे आवाहनदेखील तटकरे यांनी केले आहे. दरम्यान, गेल्या पाच वर्षांपासून येथील जनतेशी ऋणानुबंध ठेवले. या माझ्या मतदारसंघात कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली आहेत. विरोधकांकडे कोणतेही मुद्दे नसल्यामुळे वाटेल ते आता बोलायला लागलेत. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. मात्र माझी निवडणूक माझ्या माताभगिनींनी खांद्यावर घेतली आहे. त्यामुळे येथील जनता येत्या २० तारखेला महायुतीच्या उमेदवाराला म्हणजे धनुष्यबाण चिन्हासमोरील बटन दाबून मला प्रचंड मतांनी विजयी करेल, असा विश्वास आ.महेंद्र दळवी यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *