पनवेल (संजय कदम) : एटीएम कार्डची हातचलखीने अदलाबदल करून १३ हजार रुपयांचा अपहार केल्याची घटना तालुक्यातील ढोंगऱ्याचापाडा ऍक्सिस बँकेच्या एटीएम सेंटर मध्ये घडली आहे.
दीपककुमार मुखिया ( वय २३ ) हे त्यांच्या मामाचे आयडीबीआय बँकेचे एटीएम घेऊन ढोंगऱ्याचापाडा ऍक्सिस बँकेच्या एटीएम सेंटर मध्ये आले मशीन मधून पैसे काढत असताना दोन अज्ञात इसम त्या ठिकाणी आले व त्यांनी दीपककुमार यांना बोलण्यात गुंगवून हातचलाखीने एटीएम कार्ड ची अदलाबदली केली व त्या कार्डचा वापर करून १३ हजार रुपये काढून घेऊन अपहार केल्याने याबाबतची तक्रार तळोजा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.