नागोठणे (महेंद्र माने) : नागोठणे येथील भारतीय एज्युकेशन सोसायटी इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी कॉलेज बी. फार्मसी पदवी या कोर्ससाठी फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया, नवी दिल्ली व डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजि यूनिर्वसिटी, लोणेरे यांच्याकडून सन 2022 -23 या शैक्षणिक वर्षापासून मान्यता मिळाली आहे. या कोर्सला मान्यता मिळाल्यामुळे रायगड जिल्हयातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बी. फार्मसी पदवी घेण्याची सुवर्ण संधी मिळाली आहे.
भाएसो संस्थेमध्ये संस्थापक – अध्यक्ष किशोर जैन यांनी 2006 मध्ये डिप्लोमा इन फार्मसी या कोर्सची स्थापना केली असून विद्यार्थ्यांना दिलेल्या संधि मधून गेल्या 16 वर्षामध्ये ग्रामीण भागातील हजारो गरजू विद्यार्थी स्वावलंबी झाले असून हे विद्यार्थी समाजामध्ये होलसेल आणि रिटेल मेडिकल व्यवसायातून रुग्णसेवा देत फार्मा उद्योगामध्ये आपले योगदान देत आहेत.
आता नव्याने सुरू होणार्या बी. फार्मसी कोर्स 4 वर्षांचा असून प्रवेशासाठी सदरील विद्यार्थी हा बारावी सायन्स व MHT-CET & NEET मधील सर्व विषयांमध्ये उत्तीर्ण तसेच MHT-CET & NEET मध्ये शून्य नसलेले गुण प्राप्त केले असावे. यामध्ये ग्रुप अंग्रिगेट 45% खुल्या प्रवर्गासाठी व 40% इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी (Phy, Chem, Bio/Maths) असावेत.
सदरील कोर्स पूर्ण केल्यानंतर सरकारी क्षेत्रामध्ये फार्मसिस्ट, ड्रग इन्स्पेक्टर किंवा फार्मस व्यवसाय व नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होत आहेत. सदरील कोर्स हा रायगड जिल्ह्यातील मध्यवर्ती भागात असल्याने जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बी. फार्मसी पदवी घेण्याची सुवर्ण संधी मिळाली असल्याने विद्यार्थ्यासह पालकांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.
संस्थेमध्ये नव्याने सुरू झालेल्या बी. फार्मसी या पदवीमध्ये डी. फार्मासी झालेल्या विद्यार्थ्यांना बी. फार्मसीमध्ये दुसर्या वर्षात प्रवेशाची संधि मिळणार असून या पदवीनंतर फार्मसी विभागामध्ये विद्यार्थ्यांना प्रोडक्शन केमिस्ट, रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट फॉर्मुलेशन अॅण्ड डेव्हलपमेंट अॅनालिस्ट तसेच शासनाकडून विविध पदावर फार्मासिस्ट म्हणून करियरच्या संधी उपलब्ध आहेत. बी. फार्मसी साठी नोंदणी पूर्ण झालेले विद्यार्थी आपल्या संस्थेत प्रवेशाकरीता अर्ज करू शकतात. आपल्या संस्थेत उच्च शिक्षित प्राध्यापक, सुसज्ज प्रयोगशाळा आणि ग्रंथालय सारख्या सुविधा उपलब्ध आहेत त्यांचा हात विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन करीत असून भविष्यात एम. फार्मासी कोर्स सुरू करण्याचा मानस आहे.
–प्रा. समीर पवार, प्राचार्य, भा.ए.सो. इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी कॉलेज, नागोठणे