नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांची नावे जाहीर करण्याच्या बाबतीत भाजपाने आघाडी घेतली आहे. आज भाजपाने १६ राज्यातील आपल्या १९५ उमेदवारांची नावे जाहीर केली. भाजपाचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या यादीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपाचे पहिले उमेदवार असून ते त्यांच्या वाराणसी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढणार आहेत.
विनोद तावडे यांनी म्हटले की, २९ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत १९५ उमेदवारांची नावे निश्चित केली आहेत. देशातील १६ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधील उमेदवारांची यादी आज जाहीर करत आहोत.
भाजपा सरचिटणीस विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, भाजापाच्या लोकसभेच्या उमेदवारांची राज्यनिहाय संख्या पुढील प्रमाणे – उत्तर प्रदेश सर्वाधिक ५१, पश्चिम बंगाल २०, मध्य प्रदेश २४, गुजरात १५, राजस्थान १५, केरळ १२, तेलंगणा ९, आसाम ११, झारखंड ११, छत्तीसगड ११, दिल्ली ५, जम्मू काश्मीर २, उत्तराखंड ३, अरुणाचल प्रदेश २, गोवा १, त्रिपुरा १, अंदमान निकोबार १ आणि दिव-दमणमधील १ उमेदवार.
या यादीत महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचे नाव नाही. पहिल्या यादीत एकुण २८ महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामध्ये ३४ विद्यमान केंद्रीय मंत्र्यांची नावे आहेत. किरेन रिजीजू अरुणाचल प्रदेश पश्चिम, अमित शाह गांधीनगर इत्यादींची नावे आहेत.
भाजपाचे जाहीर झालेले काही महत्वाचे उमेदवार
* मनसुख मांडविया पोरबंदर
* राजनाथ सिंह लखनौ
* जितेंद्र सिंह उधमपूर
* किरेन रिजिजू अरुणाचल प्रदेश पूर्व
* सर्वानंद सोनोवाल डिब्रूगढ आसाम
* संजीव बालियान मुज्जफरनगर
* विनोद चावडा कच्छ गुजरात
* मनसुख बसावा भरुच
* सी. आर. पाटील नवसारी
* सरोज पांडेय कोरबा छत्तीसगढ
* विजय बघेल दुर्ग
* बृजमोहन अग्रवाल रायपूर
* जुगल किशोर शर्मा जम्मू
* मनीष जयस्वाल हजारीबाग
* प्रवीण खंडेलवाल चांदणी चौक दिल्ली
* मनोज तिवारींना उत्तर-पूर्व दिल्ली
* बांसुरी स्वराज मध्य दिल्ली
* कमलकित सहरावत पश्चिम दिल्ली
* रामवीर बिधुडी दक्षिण दिल्ली
BJP’s list of 195 candidates from 16 states announced, Prime Minister Modi will contest from Varanasi
New Delhi: BJP has taken the lead in announcing the names of the candidates for the Lok Sabha elections. Today, BJP announced the names of its 195 candidates in 16 states. BJP General Secretary Vinod Tawde gave this information in a press conference. According to this list, Prime Minister Narendra Modi is the first candidate of BJP and he will contest the Lok Sabha elections from his Varanasi constituency.
Vinod Tawde said that on February 29, Prime Minister Narendra Modi and BJP president J. P. The names of 195 candidates have been decided in the Central Election Committee meeting chaired by Nadda. Today we are announcing the list of candidates from 16 states and two Union Territories of the country.
According to the information given by BJP General Secretary Vinod Tawde in a press conference, the state wise number of Lok Sabha candidates of BJP is as follows – Uttar Pradesh has the most 51, West Bengal 20, Madhya Pradesh 24, Gujarat 15, Rajasthan 15, Kerala 12, Telangana 9, Assam 11, Jharkhand 11, Chhattisgarh. 11, Delhi 5, Jammu Kashmir 2, Uttarakhand 3, Arunachal Pradesh 2, Goa 1, Tripura 1, Andaman Nicobar 1 and 1 candidate from Diu-Daman.
There is no name of any candidate from Maharashtra in this list. A total of 28 women have been nominated in the first list. It contains the names of 34 existing Union Ministers. Names are Kiren Rijiju Arunachal Pradesh West, Amit Shah Gandhinagar etc.
Some important candidates announced by BJP * Mansukh Mandavia Porbandar * Rajnath Singh Lucknow * Jitendra Singh Udhampur * Kiren Rijiju Arunachal Pradesh East * Sarbananda Sonowal Dibrugarh Assam * Sanjeev Balian Muzaffarnagar * Vinod Chawda Kutch Gujarat * Have a good rest * C. R. Patil Navsari * Saroj Pandey Korba Chhattisgarh * Vijay Baghel Durg * Brijmohan Aggarwal Raipur * Jugal Kishore Sharma Jammu * Manish Jaiswal Hazaribagh * Praveen Khandelwal Chandni Chowk Delhi * North-East Delhi to Manoj Tiwari * Bansuri Swaraj Central Delhi * Kamalkit Sahrawat West Delhi * Ramveer Bidhudi South Delhi