Corona : ’माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेचा ठाणे ग्रामीणमध्ये शुभारंभ; 430 ग्रा.पं.मध्ये प्रभावी अंमलबजावणी

ठाणे : माझे कुटुंब माझी जबाबदारी या महत्वाकांक्षी मोहिमेचा ठाणे ग्रामीणमध्ये आज शुभारंभ करण्यात आला. जिल्ह्याच्या मुरबाड, अंबरनाथ, कल्याण, भिवंडी, शहापूर तालुक्यातील लोकप्रतिनिधीच्या हस्ते मोहिमेचे उदघाटन करण्यात आले. या मोहीमेमुळे ४३० ग्रामपंचायत क्षेत्रात कोव्हिडवर नियंत्रण  मिळविण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी होईल.

ठाणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष  सुषमा लोणे, मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याच्या ग्रामीण भागात माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम राबविण्यात येत आहे.

*545 पथकांची नेमणूक ;  सर्वेक्षणासाठी पथक घरोघरी
*
राज्य शासनाने कोव्हिडं १९ चे उच्चाटन करण्यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेद्वारे संशयित कोव्हिडं तपासणी, व  उपचार, अति जोखमीचें व्यक्ती ओळखून त्यांना उपचार व कोव्हिडं १९ प्रतिबंधासाठी आरोग्य शिक्षण, रुग्णांचे गृहभेटीद्वारे संरक्षण, कोव्हिडं तपासणी आणि उपचार, आरोग्य शिक्षण, हे मोहिमेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. ग्रामीण भागात ३३ प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर मोहीम राबविण्यात येत आहे. या  मोहिमेत आरोग्य विभागा मार्फत घरोघरी जाऊन नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. यासाठी ५४५ पथकांची नेमणूक करण्यात आलेली आहे. या पथकात आरोग्य कर्मचारी, आशा, अंगणवाडी कार्यकर्ती, स्थानिक स्वयंसेवक यांचा समावेश आहे. हे पथक थर्मल स्कॅनर, प्राणवायु मोजणार यंत्र आणि इतर अनुषंगिक साहित्य सामग्री घेऊन पथक घरोघरी सर्वेक्षण करत आहे

*लोकप्रतिनिधीचा उस्फुर्त सहभाग
*
शहापूर पंचायत समिती स्तरावर आमदार दौलत दरोडा यांच्या उपस्थितीत मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पत्रकारांना मास्क वाटप करण्यात आले. जिल्हा परिषद विषय समिती सभापती, पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य , पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य या मान्यवर लोकप्रतिनिधी यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात मोहिमेत सहभागी होत उदघाटन केले.

१५ सप्टेंबर २०२० ते १० ऑक्टोबर २०२० आणि १४ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर २०२० या दोन टप्प्यात ही मोहीम राबविण्यात येणार आहे. जनजीवन पूर्वपदावर आणण्याबरोबरच कोव्हीडचा वाढता प्रादुर्भाव अधिक प्रभावीपणे नियंत्रित करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.  आजच्या पहिल्या दिवशीच आरोग्य विभागाचे कर्मचारी, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका, स्थानिक स्वयंसेवक यांचे पथक तयार करून घरोघरी सर्वेक्षण करण्यात येत आहे.

संपर्क अधिकारी मोहिमेत सहभागी

कोव्हिडं नियंत्रित करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखील प्रत्येक तालुका स्तरावर जिल्ह्यातील खातेप्रमुखांची संपर्क अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे. या संपर्क अधिकाऱ्यांनी आपापल्या तालुक्यात प्रत्येक्ष  जाऊन मोहीमेत सहभाग दर्शवला.   तालुका स्तरावर प्रत्येक तालुक्याचे गट विकास अधिकारी यांनी मोहिमेचे नियोजन केलें आहे.