Corona : मास्क वापरा, हात धुवा, सोशल डिस्टेंसिंग पाळा, श्रीवर्धनकरांना खा. तटकरे यांची कळकळीची विनंती

श्रीवर्धन(विजय गिरी) : कोरोनाचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत आहे. दिवेसंदिवस बाधितांची संख्या वाढत असल्याने चिंतेचे वातावरण आहे. लोक नियम पाळत नसल्याने बाधितांची संख्या वाढतेय येत्या काही दिवसांत कोरोना बाधितांची संख्या वाढेल असा अंदाज आरोग्य विभागाकडून वर्तवण्यात आला येतोय हि बाब सगळ्यांनी गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. काही ठिकाणी 90%लोक बिना मास्कचे वावरताना पाहायला मिळाले हे विदारक दृश्य पाहताना मनाला खूप दुःख होत आहे. मास्क न वापरणाऱ्या बाधितांमुळे कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत असल्याच्या घटना आढळून येत असल्याने कोरोनाला हरवायचे असेल, तर सर्वानी मास्क वापरून हात सतत धुवून सोशल डिस्टेंसिंग पाळा, अशी श्रीवर्धन वासियांना कळकळीची विनंती खासदार सुनील तटकरे यांनी श्रीवर्धन येथे नागरपालीकेत पत्रकारांशी संवाद साधताना केली.

या वेळी त्यांच्या समवेत नगराध्यक्ष जितेंद्र सातनाक  तालुका अध्यक्ष दर्शन विचारे, प्रांताधिकारी अमित शेडगे, तहसीलदार सचिन गोसावी, मुख्याधिकारी किरणकुमार मोरे,डॉ. अबू राऊत, आदी उपस्थति होते, या वेळी संवाद साधताना तटकरे साहेब म्हणाले की मास्क वापराची सक्ती करावीच लागणार, कटू वाटेल, परंतु जो मास्क वापरणार नाही, त्याला दंड लावला पाहिजे सर्वांच्या हितासाठी कटुता आली तरी चालेल ज्यांचा ज्यांचा जास्त लोकांचा सतत संपर्क येतो, त्यांनी अँटीजेन टेस्ट करून घेतलीच पाहिजे, भाजी विक्रेते फळ विक्रेते व इतर विक्रेतानी अँटीजेन टेस्ट करणे क्रमप्राप्त आहे. या साठी अँटीजेन टेस्ट देखील जास्तीत जास्त उपलब्ध करून घेणार असल्याचे सांगितले, मास्क न वापरल्याने गो कॊरॊना गो असे म्हणण्या ऐवजी कम कोरोना कम अशा पद्धतीत काही लोक वावरताहेत.

सर्वांच्या आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षेचे नियम न पाळणाऱ्यांवर कठोर कारवाईचा बडगा वेळ पडल्यास उभारावा लागेल. या वेळी तटकरे साहेबानी लॉक डाऊन काळात वर्क फ्रॉम होम तसेच ऑन लाईन स्कुल, ऑन लाईन लेक्चर या पार्श्वभूमीवर श्रीवर्धन तालुक्यातील बी एस एन एल, तसेच जिओ सेवे बाबत संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना मुंबईतून श्रीवर्धन येथे बोलावून घेऊन जनते समोर आढावा घेतला, जनतेच्या तक्रारी ऐकून घेत त्या सोडवण्याच्या सूचना संबंधितांना देऊन सेवा अधिकाधिक सुरळीत व अखंडपणे देण्याविषयी उपाययोजना करण्यास सांगितल्या. उपाययोजना करताना काही अडथळे आल्यास आपण सोबत असल्याचे अभिवचन दिले.

वीज प्रवाह व वीज बिलांबाबत असलेल्या जनतेच्या तक्रारी तात्काळ सोडवण्या संदर्भात अभियंताना सांगितले. निसर्ग चक्रीवादळात वाटप केलेल्या मदतीचा आढावा घेतला. मदतीची रक्कम लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा होते. हि रक्कम संबंधित लाभार्थ्याच्या इतर कर्जाच्या हफ्त्या पोटी बँकेने जमा करून घेऊ नये यासाठी तसे पत्र देण्याच्या सूचना दिल्या, 108 रुग्णवाहिकेला 200 कि .मी .प्रवासाची परवानगी द्यावी या साठी प्रयत्न करणार असल्याचे शेवटी सांगितले.