सुकेळी (दिनेश ठमके) : रोहा तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या थांबण्याचे काही नावच घेत नाही. दिवसेंदिवस कोरोनाचे अनेक नविन रुग्ण पाँझिटिव्ह आढळुन येत आहेत. यामध्ये नागोठणे जवळच असलेल्या ऐनघर ग्रामपंचायत हद्दीमधिल अनेक गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे विभागात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोरोनाची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच असतांना कोरोना सुरु झाल्यापासुन ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण कमी प्रमाणात आढळत होते. पंरतु सद्यपरिस्थितीत ग्रामीण भागामध्ये कोरोनाचे मोठ्या प्रमाणात पाँझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत. ऐनघर ग्रामपंचायत हद्दीमध्ये देखिल मोठ्या प्रमाणात कोरोनाने शिरकाव केला आहे. या विभागामध्ये पहिल्यादाच जिंदाल काँलनी, पाईप नगर सुकेळी येथे कोरोनाची लागण झाली .त्यानंतर ही संख्या वाढतच जाऊन जिंदाल साँ, सुकेळी ,ऐनघर, बाळसई, कानसई या ठिकाणी देखिल कोरोनाचे रुग्ण पाँझिटीव्ह सापडले आहेत. अद्यापपर्यंत कोरोना सुरू झाल्यापासुन या ऐनघर पंचायत हद्दीमध्ये एकही कोरोनाचा रुग्ण आढळला नव्हता. पंरतु सद्यपरिस्थितीत ही संख्या वाढतच चालललेली दिसत आहे.
दरम्यान या विभागामधिल जे रुग्ण कोरोना पाँझिटिव्ह आलेले आहेत त्यांच्यातील काहींवर सरकारी तर काहींवर खाजगी रुग्णालयात ऊपचार सुरु आहेत. तर काही कोरोना पाँझिटिव्ह रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत . त्यामुळे नागरिकांमध्ये समाधाचे वातावरण देखिल दिसत आहे.