Coronavirus: जगात पहिल्यांदाच कोरोनाचा २४ तासांचा विक्रमही आता भारताच्या नावावर जमा : ७५ हजारांवर रुग्ण

नवी दिल्ली : भारत देशामध्ये गुरुवारी कोरोनाचे ७५,७६० रुग्ण आढळून आले. जगभरातील कोणत्याही देशात 24 तासात  इतक्या मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण आजवर आढळले नव्हते. त्यामुळे तो विक्रमही आता भारताच्या नावावर जमा झाला आहे. या आजारातून बरे होणाऱ्यांचे देशातील प्रमाण आता ७६.२४ टक्के झाले असून, त्यांची संख्या २५ लाखांवर पोहोचली आहे.

भारत देशात कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता ३३,१०,३२४ झाली आहे. केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी आणखी १,०२३ जण मरण पावल्याने कोरोना बळींचा एकूण आकडा ६०,४७२ झाला आहे. या आजारातून २५,२३,७७१ जण पूर्णपणे बरे झाले.

आज देशात 7,25,991 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असून ही संख्या एकूण रुग्णसंख्येच्या 21.93% इतकी आहे. दररोज होणाºया कोरोना चाचण्यांचे वाढते प्रमाण, रुग्णांवर वेळीच होणारे उपचार यामुळे मृत्युदर 1.83% इतका कमी राखण्यात सरकारी यंत्रणांना
यश आले आहे.