CoronaVirus : देशात मृतांची संख्या 50 हजारांच्या पुढे, मागील 10 दिवसांत 10 हजार जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : खूप वाईट बातमी. शनिवारी देशात संक्रमणामुळे होणार्‍या मृत्यूंची संख्या 50 हजारांच्या पुढे गेली. स्थिती अशी आहे की गेल्या 10 दिवसात 10 हजार लोक मरण पावले आहेत. हाच वेग सतत वाढत चालला आहे. देशातील कोरोनाचा पहिला मृत्यू 11 मार्च रोजी झाला. नंतर, 97 दिवसात मरण पावलेल्यांची संख्या वाढून 10 हजार झाली होती.

यानंतर, मृत्यूचा हा वेग इतका वाढला की, की पुढील 40 दिवसांत, संसर्गामुळे मृत्यूंची संख्या 10 हजारांवरून 50 हजारांवर गेली. सर्वाधिक मृत्यू असलेल्या देशात भारत आता जगातील चौथा देश बनला आहे. जगात कोरोनामुळे 7 लाख 63 हजारांहून अधिक लोक मृत्यूमुखी पडले आहेत. यातील 6.5% मृत्यू हे भारतातील होते. म्हणजेच कोरोनामुळे जगात प्राण गमावणार्‍या प्रत्येक 100 रुग्णांपैकी 7 भारतीय आहेत.

डिसेंबरपर्यंत जाऊ शकतो 1.74 लाखांहून अधिक लोकांचा बळी
सध्या, अमेरिका, ब्राझील आणि भारतात जगातील सर्वात जास्त मृत्यू होत आहेत. जगातील एकूण मृत्यूंपैकी 18.83% अमेरिकेत, 16.93% ब्राझील आणि 16.65% भारतातील आहेत. आकडेवारीच्या अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की या वर्षाच्या अखेरीस 31 डिसेंबरपर्यंत मृत्यूची संख्या अशीच वाढत राहिली तर देशात संक्रमणामुळे 1.74 लाखाहून अधिक लोक आपला जीव गमावतील. सध्या भारतात दररोज सरासरी 900 लोकांचा मृत्यू होत आहे.

मृत्यूची संख्या वाढत आहे पण मृत्यूदर कमी होत आहे
देशात संसर्गामुळे मृतांचा आकडा सतत वाढत आहे. तथापि, संसर्गाच्या प्रकरणांची संख्या वाढत असताना मृत्यूचे प्रमाण वाढताना दिसत नाही ही एक दिलासाची बाब आहे. आरोग्य मंत्रालयानुसार, लॉकडाऊनच्या पहिल्या आठवड्यात मृत्यूदर 2.1% होता. त्यानंतर एप्रिलमध्ये तो 2.83% पर्यंंत वाढला. जूनच्या दुसर्‍या आठवड्यात मृत्यूदर 3.36% होता. आता तो सातत्याने कमी होत आहे. सध्या, मृत्यूदर 1.8% आहे.

देशातील मृत्यूंपैकी 71% मृत्यू फक्त पाच राज्यात झाले
आतापर्यंत झालेल्या एकूण मृत्यूंपैकी केवळ पाच राज्यांमध्ये 71.94% मृत्यू आहेत. महाराष्ट्रत सर्वाधिक मृत्यू 39.45% लोकांचा मृत्यू, तामिळनाडूमध्ये 11.22%, दिल्लीत 8.35% आणि कर्नाटकात 7.43% लोकांचा मृत्यू झाला आहे.