CoronaVirus : धोका वाढला! राज्यात एका दिवसात आल्या 19,218 नव्या केस, 378 रूग्णांचा मृत्यू

मुंबई : आरोग्य विभागाने दिलेल्या महितीनुसार, महाराष्ट्रात शुक्रवारी एका दिवसात कोरानाची सर्वाधिक 19,218 नवी प्रकरणे सापडल्यानंतर राज्यात एकुण संक्रमितांची संख्या वाढून 8,63,062 झाली आहे. आणखी 378 रूग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची एकुण संख्या वाढून 25,964 झाली आहे. सध्या राज्यात 2,10,978 रूग्ण उपचार घेत आहेत. तर शुक्रवारी आणखी 13,289 रूग्ण बरे झाले. त्यामुळे बरे झालेल्या रूग्णांची एकुण संख्या 6,25,773 झाली आहे.

देशपातळीवर कोरोनाने पुन्हा विक्रम केला आहे. देशात कोरोना रूग्णांची संख्या 40 लाखांच्या पुढे गेली आहे. मागील 24 तासात कोरोनाची 86 हजार 432 नवी प्रकरणे समोर आली. तर 1089 रूग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकुण कोरोना संक्रमितांची संख्या 40, 23,179 झाली आहे. शुक्रवारी देशात 83,341 नवे रूग्ण सापडले होते, तर 1,096 लोकांचा मृत्यू झाला होता