CoronaVirus : पुन्हा राष्ट्रव्यापी लॉकडाऊन! ‘या’ देशाने घेतला निर्णय

जेरूसलेम : अनेक देशांमध्ये थंडावलेला कोरोनाचा उद्रेक पुन्हा सुरू झाल्याने स्थिती बिकट होत चालली आहे. अनेक देशांमध्ये नवीन रूग्ण सापडण्याचे प्रमाण पुन्हा वाढले आहे. याच कारणामुळे इस्त्रायल या देशाने दुसर्‍या टप्प्यातील राष्ट्रीय लॉकडाऊनची घोषणा केली आहे. जगातील हा पहिला देश आहे ज्याने दुसर्‍यांदा राष्ट्रीय लॉकडाऊन जाहीर केले आहे. या लॉकडाऊनची मोठी किंमत चुकवावी लागेल, असेही इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेत्यानाहू यांनी म्हटले आहे. शुक्रवारी 2 वाजल्यापासून येथे 21 दिवसांचे लॉकडाऊन सुरू होत आहे.

कसे असेल येथील लॉकडाऊन
– सर्व पब, रेस्टॉरंट (डिलिव्हरी सुरू राहिल), दुकाने आणि रिक्रिएशनल फॅसिलिटी बंद राहील.
– शाळा सुद्धा बंद राहतील
– लोकांना घरापासून 500 मीटरपेक्षा दूर जाण्याची परवानगी असणार नाही.

इस्त्रायलमधील सध्यस्थिती
– इस्त्रायलची लोकसंख्या सुमारे 88 लाख
– 37,400 पेक्षा जास्त अ‍ॅक्टिव्ह प्रकरणे
– रविवारी 3100 पेक्षा जास्त लोक पॉझिटिव्ह आढळले
– संक्रमित लोकांची संख्या 156,596 आहे
– 1119 लोकांचा मृत्यू झाला आहे
– कमी लोकसंख्येचा विचार करता इस्त्रायलसाठी ही बिकट स्थिती आहे