Coronavirus : महाराष्ट्रातील कोराना रूग्णांची संख्या साडेपाच लाखांच्या पुढे, 24 तासात आल्या 12,608 नव्या केस

मुंबई : आरोग्य विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात शुक्रवारी कोरोना व्हायरसच्या संक्रमणाचे 12,608 नवे रूग्णा सापडले आहेत. यामुळे आता राज्यात कोविड-19 च्या एकुण प्रकरणांची संख्या वाढून 5,72,734 झाली आहे. या दरम्यान कोरोनामुळे आणखी 364 रूग्णांचा मृत्यू झाल्याने एकुण मृतांची संख्या वाढून 19,427 झाली आहे. महाराष्ट्रात कोविड-19 चे 4,01,442 रूग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत 30,45,085 लोकांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे.

देशात कोरोना रूग्णांची संख्या 25 लाखांच्या पुढे
देशात मागील 24 तासात कोरोना रूग्णांच्या संख्येने 25 लाखांचा टप्पा पार केला आहे. शुक्रवारी कोरोनाचे 65 हजार 2 नवे रूग्ण सापडले. तर 996 रूग्णांचा मृत्यू झाला. नवी प्रकरणे आल्यानंतर देशात कोरोना संक्रमित रूग्णांची एकुण संख्या 25 लाख 26 हजार 192 झाली आहे.

देशात आता कोरोनाच्या 6 लाख 68 हजार 220 अ‍ॅक्टिव्ह केस आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत 49 हजार 36 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 18 लाख 8 हजार 936 रूग्ण बरे झाले आहेत. देशात महाराष्ट्र सर्वात जास्त पीडित आहे