मुंबई : आरोग्य विभागाने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात सोमवारी कोरोनाचे 11 हजार 852 नवे रूग्ण सापडले आहेत. तर 11 हजार 158 रूग्ण बरे झाले असून 184 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात 1 लाख 94 हजार 56 रूग्णांवर उपचार सुरू असून आतापर्यंत 5 लाख 73 हजार 559 रूग्ण बरे झाले आहेत. तर एकुण 24 हजार 583 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये महाराष्ट्रात 9 हजार 589 रूग्णांचा मृत्यू झाला.
देशभराचा विचार करता दिलासादायक बाब म्हणजे सोमवारी मागील दिवसांच्या तुलनेत सोमवारी कमी पॉझिटिव्ह रूग्ण सापडले. 24 तासात 69 हजार 921 नवे रूग्ण सापडले आहेत. तर एका दिवसात 819 लोकांचा मृत्यू झाला. संक्रमितांच्या आकड्यांमध्ये मागील सहा दिवसात आणि मृत्यूंच्या आकड्यांमध्ये मागील 28 दिवसात मोठी घसरण झाली आहे.
यापूर्वी 25 ऑगस्टला 66 हजार 873 केस आल्या होत्या, तर 3 ऑगस्टला 806 संक्रमितांचा मृत्यू झाला होता. देशात कोरोना व्हायरसच्या रूग्णांची संख्या वाढून 36 लाख 91 हजार 167 झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे देशात मृत्यदरात लागोपाठ घसरण होत असून आता तो 1.78% झाला आहे.