CoronaVirus : राज्यात अवघ्या 24 तासात सापडले 24,619 कोरोना संक्रमित

मुंबई : महाराष्ट्रात अवघ्या 24 तासात 24,619 कोरोना संक्रमित सापडले आहेत आणि 398 लोकांचा मृत्यू झाला आहे. यासोबत राज्यात कोरोना संक्रमितांचा आकडा 11.45 लाखांपेक्षा जास्त झाला आहे.

देशात आता कोरोनाचा एकुण आकडा 52 लाखांच्या पुढे गेला आहे. येथे 41 लाखांपेक्षा जास्त लोक बरे होऊन घरी परतले आहेत, तर, 10.17 लाख लोक अजूनही हॉस्पीटलमध्ये आहेत.

महाराष्ट्रातील आकडे

– एकुण संक्रमित – 11,45,840
– एकुण मृत – 31,351
– 24 तासात बरे झालेले रूग्ण – 19,522
– एकुण बरे झालेले रूग्ण – 8,12,354
– कोरोनाच्या अ‍ॅक्टिव्ह केस – 3,01,752