मुंबई : महाराष्ट्रात कोरोना रूग्णांचा आकडा 11 लाखांच्या जवळ पोहचला आहे. 24 तासात येथे 20 हजार 482 नवी प्रकरणे वाढली. आतापर्यंत 10 लाख 97 हजार 856 लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यापैकी 7 लाख 75 हजार 273 लोक बरे झाले आहेत, तर 2 लाख 91 हजार 797 रूग्णांवर अजूनही उपचार सुरू आहे. 30 हजार 409 लोकांनी आतापर्यंत कोरोनामुळे जीव गमावला आहे.
देशात संक्रमितांची संख्या 50 लाखांच्या पुढे
भारतात कोरोना व्हायरस संक्रमितांचा आकडा 50 लाखांच्या पुढे गेला आहे. आतापर्यंत 50 लाख 20 हजार 360 लोक संक्रमित आढळले आहेत. 24 तासात देशात कोरोनाचे 90 हजार 123 नवे रूग्ण सापडले. मंगळवारी 1290 संक्रमितांचा मृत्यू झाला. कोरोनाने मरणार्यांची देशातील एकुण संख्या आता 82 हजार 66 झाली आहे. तर बरे होणार्यांची संख्या 39 लाखांपेक्षा जास्त झाली आहे. आतापर्यंत 39 लाख 42 हजार 361 लोक बरे झाले आहेत. मंगळवारी विक्रमी 82 हजार 844 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला. यासोबतच रिकव्हरी रेट सुद्धा दोन दिवसात 0.45% नी वाढून 78.45% झाला आहे. सध्या देशात कोरोनाच्या 9 लाख 95 हजार 933 अॅक्टिव्ह केस आहेत.