मुंबई : आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात शनिवारी कोरोनाची 12,614 नवी प्रकरणे समोर आली, यामुळे एकुण प्रकरणांची संख्या 5,84,754 झाली आहे. शनिवारी आणखी 322 रूग्णांचा मृत्यू झाला यामुळे मृतांची संख्या वाढून आता 19,749 झाली आहे. मुंबई शहरात शनिवारी 1,254 प्रकरणे समोर आली, तर 48 लोकांचा मृत्यू झाला.
देशात 63 हजार 490 नवी प्रकरणे
देशात मागील 24 तासात कोरोनाची 63 हजार 490 नवी प्रकरणे समोर आली, तर 944 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. नव्या केस समोर आल्यानंतर देशात एकुण रूग्णांची संख्या 25 लाख 89 हजार 682 झाली आहे. शुक्रवारी कोरोनाची 65,002 प्रकरणे समोर आली होती, तर 996 रूग्णांचा मृत्यू झाला होता.
देशात सध्या कोरोनाच्या 6 लाख 77 हजार 444 अॅक्टिव्ह केस असून आतापर्यंत 49 हजार 980 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच, आतापर्यंत 18 लाख 62 हजार 258 रूग्ण बरे झाले आहेत. देशात कोरोनाने सर्वात जास्त पीडित महाराष्ट्र आहे