CoronaVirus : राज्यात पुन्हा कोरानाचा विक्रम, 24 तासात सापडले 24,886 नवे रूग्ण, 393 रूग्णांचा मृत्यू

मुंबई : आरोग्य विभागाकडून प्राप्त माहितीनुसार महाराष्ट्रात शुक्रवारी कोरोना व्हायरस संसर्गाची विक्रमी 24,886 नवी प्रकरणे समोर आली. यानंतर संक्रमितांची एकुण संख्या वाढून 10,15,681 झाली आहे. मागील 24 तासात 393 रूग्णांचा मृत्यू झाला. यामुळे एकुण मृतांची संख्या वाढून 28,724 झाली आहे. तसेच 14,308 रूग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे कोरोना संसर्गातून बरे झालेल्या लोकांची संख्या वाढून 7,15,023 झाली आहे.

देशातही कोरोनाने विक्रम मोडला
देशाता मागील 24 तासात कोरोनाची 97 हजार 570 नवी प्रकरणे समोर आली. तर 1201 रूग्णांचा मृत्यू झाला. नवीन प्रकरणे समोर आल्यानंतर देशात कोरोना संक्रमित रूग्णांची संख्या वाढून 46 लाख 59 हजार 984 झाली आहे. दरम्यान, गुरुवारी 96 हजार 551 नवी प्रकरणे समोर आली होती, आणि विक्रमी 1209 लोकांचा मृत्यू झाला होता.

– देशात सध्या कोरोनाच्या 9 लाख 58 हजार 316 अ‍ॅक्टिव्ह केस
– 36 लाख 24 हजार 196 लोक बरे होऊन घरी गेले
– आतापर्यंत देशात 77 हजार 472 रूग्णांचा मृत्यू
– देशात मागील 24 तासांच्या आत 10,91,251 कोरोना तपासण्या
– आतापर्यंत एकुण 5,51,89,226 कोरोना चाचण्या