मुंबई : राज्यात बुधवारी सर्वाधिक14.888 नवीन रुग्ण सापडले आहेत. दिवस भरात एकूण 295 चा मृत्यू झाला. आरोग्य विभागाने सांगितले की, राज्यात एकुण संक्रमितांची संख्या वाढून 7,18,711 झाली आहे. ज्यामध्ये 7.637 रूग्ण बरे झाले आहेत, 1,72,873 उपचार सुरु आहे. सोबतच बरे झालेल्या रूग्णांची संख्या 5,22,427 झाली आहे.
मुंबईत एकूण कोरोनाची 1.39.537 प्रकरणे समोर आलीत तर 7,505, रूग्णांचा मृत्यू झाला,उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 18.979 आहे.
पुणे शहरात 24 तासात 1,640 रुग्ण सापडलेत त्यामध्ये 37 रुग्णांचा मृत्यू झालाय.मिळालेल्या माहिती नुसार महाराष्ट्रात 37,94,027 रुग्णांची तपासणी झाली आहे