मुंबई : आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात शनिवारी कोविड-19 ची 20,801 प्रकरणे समोर आली. आतापर्यंत एका दिवसातील ही सर्वात मोठी संख्या आहे. या नव्या रूग्णांसह राज्यात आता एकुण प्रकरणे 8,83,862, झाली आहेत. तर आणखी 312 रूग्णांचा शनिवारी मृत्यू झाल्याने एकुण मृतांची संख्या 26,276 झाली आहे. राज्यात लागोपाठ चौथ्या दिवशी सर्वाधिक संख्येत प्रकरणे समोर आली आहेत. शुक्रवारी 19,218 प्रकरणे समोर आली होती. सध्या एकुण 2,20,661 संक्रमित रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
देशात कोरोना व्हायरस संक्रमित रूग्णांची संख्या दररोज नवीन विक्रम प्रस्थापित करत आहे. शनिवारी कोरोना रूग्णांची संख्या विक्रमी 90 हजाराच्या पुढे पोहचली. मागील 24 तासात कोरोनाची 90 हजार 632 नवी प्रकरणे समोर आली, तर 1065 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात एकुण कोरोना रूग्णांची संख्या 41, 13,811 झाली आहे. शुक्रवारी देशात 86,432 नवे रूग्ण सापडले होते, तर 1089 लोकांचा मृत्यू झाला होता.