मुंबई : आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात शुक्रवारी कोरोना व्हायरस संक्रमणाची 14,361 नवी प्रकरणे समोर आली. संक्रमित रूग्णांची एकुण संख्या आता 7,47,995 झाली आहे. राज्यात एका दिवसात 331 रूग्णांचा मृत्यू झाला. यामुळे एकुण मृतांची संख्या वाढून 23,775 वर पोहचली आहे. सध्या 1,80,718 लोक कोरोना संक्रमित आहेत. बरे झाल्याने 11,607 रूग्णांना घरी पाठवण्यात आले आहे.