Coronavirus : राज्यात 24 तासात सापडले 12,712 नवे रूग्ण, 344 मृत्यू

मुंबई : आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार बुधवारी महाराष्ट्रात सर्वात जास्त 12,712 नवे रूग्ण सापडले आहेत. राज्यात संक्रमितांचा आकडा वाढून 5,48,313 झाला असून 24 तासात झालेल्या 344 मृत्यूंपैकी केवळ मुंबईत 279 लोकांचा मृत्यू झाला आहे. मागील एका दिवसात 13 हजारपेक्षा जास्त लोक बरे झाले आहेत.

देशात सापडले विक्रमी 66 हजार 999 नवे रूग्ण
देशात मागील 24 तासात विक्रमी 66 हजार 999 नवे कोरोना रूग्ण सापडले. यामुळे कोरोना रूग्णांचा आकडा वाढून 23 लाख 96 हजार 638 झाला आहे. एका दिवसात सापडणार्‍या रूग्णांची ही संख्या सर्वाधिक आहे. यापूर्वी 8 ऑगस्टरोजी 65 हजार 156 नवे रूग्ण सापडले होते. एका दिवसात 942 रूग्णांचा मृत्यू सुद्धा झाला आहे. बुधवारी 24 तासात विक्रमी 57 हजार 759 रूग्ण बरे झाले. एका दिवसात बरे होणार्‍या रूग्णांचा हा सर्वात मोठा आकडा आहे.

सध्या देशात सध्या कोरोनाच्या 6 लाख 53 हजार 622 अ‍ॅक्टिव्ह केस आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत 47 हजार 33 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत 16 लाख 95 हजार 982 लोक रिकव्हर झाले आहेत. देशात कोरोनाने होणार्‍या मृत्यूंमध्ये घसरण झाली आहे. मृत्युदर आता घसरून 1.96% झाला आहे. अ‍ॅक्टिव्ह केसचा दर सुद्धा कमी होऊन 27.27% झाला आहे. यासोबतच रिकव्हरी रेट 70.76% झाला आहे