CoronaVirus : रायगडची एकूण रुग्णसंख्या 37 हजारावर; 783 नवेरुग्ण, 18 जणांचा मृत्यू

पेण : रायगड जिल्ह्यात काल आढळलेल्या 783 नव्या रुग्णांमुळे एकुण रुग्णसंख्या 37 हजार 126 झाली असून 18 जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 1 हजार 6 जण मृत्युमुखी पडले, तसेच 653 जण बरे झाले.

अलिबाग तालुक्यात काल कोरोनाच्या 88 नव्या रुग्णांची नोंद झाली असून, एका रुग्णाचा मृत्यू झाला. तर दिवसभरात 106 रुग्ण कोरोनातून बरे झाले. काल अखेर तालुक्यात बाधित रुग्णांची संख्या 3 हजार 407 वर पोहोचली आहे.

पेण तालुक्यात काल कोरोनाच्या 76 नव्या रुग्णांची नोंद झाली असून, तीन रुग्णाचा मृत्यू झाला. तर दिवसभरात 44 रुग्ण कोरोनातून बरे झाले. काल अखेर तालुक्यात बाधित रुग्णांची संख्या 2 हजार 924 वर पोहोचली आहे.