CoronaVirus : रायगड जिल्ह्यात ८९३ नवीन कोरोनाचे रुग्ण १४ जणांचा मृत्यू तर ६५१ रुग्णाची कोरोंनावर मात

पनवेल ( शशिधर ) : रायगड जिल्ह्यात शनिवार १२ सप्टेंबर  रोजी ८९३ नवीन रुग्ण आढळले असून १४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६५१  रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत. रायगड जिल्ह्यात  कोरोंनाच्या रुग्णांची  एकूण संख्या ३६३४३  झाली असून जिल्ह्यात ९७४  जणांचा मृत्यू झाला आहे.

रायगड जिल्ह्यात शनिवारी कोरोनाचे ८९३ नवीन रुग्ण सापडले असून ६५१ जणांनी कोरोंनावर मात केली आहे. पनवेल तालुक्यात ४२९    नवीन रुग्ण आढळले असून पनवेल महापालिका क्षेत्रात २९१ नवीन रुग्ण आढळले  आहेत. काल पालिका क्षेत्रात ६, पनवेल ग्रामीण २, कर्जत २,रोहा २, खालापूर आणि अलिबाग येथील एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे .

पनवेल ग्रामीण मध्ये १३८, अलिबाग ९३, रोहा ८७ पेण ७९, माणगाव ७८, खालापूर ४२, उरण २८, कर्जत २३, महाड १३, पोलादापूर ७, म्हसळा ५, तळा ५, सुधागड  आणि श्रीवर्धन   मध्ये प्रत्येकी २ रुग्ण  आढळले आहे.  रायगड जिल्ह्यात १,२५,५७४  टेस्ट करण्यात आल्या असून त्यापैकी ३६, ३४३ पॉझिटिव्ह आल्या आहेत २८८ टेस्टचे रिपोर्ट अद्याप बाकी आहेत. कोरोंनावर २८,९१० जणांनी मात केली असून ६,४४५  रुग्णावर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात ९८८ जणांचा कोरोंनामुळे मृत्यू झाला आहे.

पनवेल महापालिका क्षेत्रात २९१ नवीन रुग्ण आढळले. पनवेल महापालिका क्षेत्रात ८ व्यक्तीचा कोरोंनामुळे मृत्यू झाला आहे. कळंबोली सेक्टर ११ गुरुद्वारा जवळ, सेक्टर १ ई सत्यसंस्कार सोसायटी, सेक्टर १३ संगम सोसायटी, खांदा कॉलनी सेक्टर ७ निळकंठज्योत, खारघर सेक्टर २० श्री टावर आणि कामोठे सेक्टर ८ बालाजी निवास येथील व्यक्तींचा कोरोंनामुळे मृत्यू झाला आहे. शनिवारी आढळलेल्या रुग्णांत कळंबोलीत ४८   नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या २४७४ झाली आहे. कामोठेमध्ये ६० नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या ३१९२   झाली आहे. खारघरमध्ये ८१ नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णाची संख्या २९९१  झाली आहे.

नवीन पनवेलमध्ये ५८ नवीन रुग्ण आढळल्याने  तेथील रुग्णांची संख्या २७४०   झाली आहे. पनवेलमध्ये ३८ नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या २६१४ झाली आहे. तळोजामध्ये ६ नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या ६७८  झाली आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात एकूण १४६८९ रुग्ण झाले असून १२२४४   रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३.६५  टक्के आहे. १०६ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ३३९  जणांचा मृत्यू झाला आहे.

पनवेल ग्रामीण भागात कोरोनाचे नवीन १३८ रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये उलवे ३८, सुकापूर २१, करंजाडे १५, विचुंबे ६, उसर्ली ४, शेळगहर ३, येथील कोरोना रुग्णांचा समावेश आहे. आकूर्ली आणि गव्हाण येथील एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे तर १०६  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल ग्रामीणमध्ये आज पर्यंत  कोरोंना पोझिटिव्हची संख्या ४६३७ झाली असून ३७२२ जणांनी कोरोंनावर मात केली असून ८६ जणांचा मृत्यू झाला आहे.