मुंबई : महाराष्ट्रात शनिवारी कोरोना व्हायरस संसर्गाची 22,084 नवी प्रकरणे समोर आल्यानंतर एकुण संक्रमितांची संख्या 10,37,765 झाली आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, संसर्गामुळे 391 रूग्णांचा मृत्यू झाल्यानंतर एकुण मृतांची संख्या वाढून 29,115 झाली आहे. तर बरे झाल्याने 13,489 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, ज्यानंतर एकुण बरे झालेल्यांची संख्या वाढून 7,28,512 झाली आहे. राज्यात सध्या 2,79,768 रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
देशात कोरोनाचा कहर सुरूच
देशात कोरोना व्हायरसने संक्रमित रूणांची संख्या वेगाने वाढत आहे. कोरोना संसर्गाची नवी प्रकरणे समोर आल्यानंतर देशात कोरोना संक्रमितांची एकुण संख्या 47 लाखांच्या पुढे गेली आहे. मागील 24 तासात देशात कोरोनाची 94 हजार 372 नवी प्रकरणे समोर आली, तर 1114 लोकांचा मृत्यू झाला आहे. नव्या केस समोर आल्यानंतर एकुण संक्रमितांची संख्या 47 लाख 54 हजार 356 झाली आहे. गुरुवारी 97 हजार 570 नवी प्रकरणे समोर आली होती, तर 1201 लोकांचा मृत्यू झाला होता