Coronavirus Latest Updates : महाराष्ट्रात एका दिवसात कोरोनाच्या 11 हजार केस, 8837 रुग्ण बरे झाले

मुंबई : आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात काल एका दिवसात 11 हजार पेक्षा जास्त केस समोर आल्या आहेत. राज्यात आज 11111 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 8837 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 417123 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 158395 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 70% झाले आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात कोरोना रूग्णांची संख्या 26 लाखांच्या पुढे गेली आहे. तसेच 50 हजारपेक्षा जास्त रूग्णांचा मृत्यू झाला आहे. बरे झालेल्या रूग्णांची संख्या 19 लाखांच्या पुढे गेली आहे. मागील 24 तासात कोरोनामुळे 944 लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 50,951 लोकांचा मृत्यू झाला आहे. आता कोरोनाच्या एकुण केस 26,42,344 झाल्या आहेत. एक दिवसात 63 हजारपेक्षा जास्त नव्या केस आल्या. देशात सध्या कोरोनाच्या अ‍ॅक्टीव्ह केस सुमारे 7 लाख आहेत. आतापर्यंत 19,09,541 रूग्ण बरे झाले आहेत

दिल्लीत 24 तासात 1200पेक्षा जास्त नवीन प्रकरणे आली आहेत. येथे एकुण रूग्णांची संख्या 1.51 झाली आहे. तर बरे होण्याचा दर रविवारी 90 टक्क्यांपेक्षा जास्त झाला आहे. मध्य प्रदेशात 24 तासात कोरोनाच्या एक हजारपेक्षा जास्त प्रकरणे आली आहेत. राजस्थानमध्ये 24 तासात कोरोनाची विक्रमी 1300 प्रकरणे आली. गुजरातमध्ये आतापर्यंत कोरोना रूग्णांची एकुण संख्या 78,783 झाली आहे, तर बरे झालेल्या रूग्णांची एकुण संख्या 61,496 झाली आहे