Coronavirus Latest Updates : राज्यात 24 तासात समोर आली कोरोनाची 11,813 नवी प्रकरणे, 413 मृत्यू

मुंबई : महाराष्ट्रात गुरूवारी कोरोना व्हायरस संसर्गाची 11,813 नवी प्रकरणे समोर आली. यामुळे आता राज्यात एकुण संसर्गाची प्रकरणे वाढून 5,60,126 झाली आहेत. गुरुवारी राज्यात कोविड-19 मुळे आणखी 413 रूग्णांचा मृत्यू झाल्याने एकुण मृतांची संख्या वाढून 19,063 झाली आहे. मागील 24 तासात 9,115 रूग बरे झाले आहेत. सध्या राज्यात 1,49,798 रूग्णांवर उपचार सुरू आहे. आतापर्यंत राज्यात कोविड-19 चे 3,90,948 रूग्ण बरे झाले असून 29,76,090 लोकांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे.

तर केंद्रीय आरोग्याने जारी केलेल्या आकडेवारीनुसार देशात एका दिवसात कोरोना व्हायरस संसर्गाची 64,553 नवी प्रकरणे समोर आली आहेत. यामुळे संसर्गाची एकुण प्रकरणे वाढून 24,61,190 झाली आहेत. मागील 24 तासात 1007 लोकांचा कोरोना महामारीमुळे मृत्यू झाला आहे. तर, देशात 17,51,555 कोरोना रूग्णांना डिस्चार्ज दिला आहे. रूग्ण संक्रमणमुक्त होण्याचा दर वाढून 70.77 टक्के झाला आहे. तर मृत्युदर 1.96 टक्के झाला आहे.

जगभरात 2 कोटी 8 लाखांपेक्षा जास्त लोकांना संसर्ग झाला आहे. तर सुमारे 7 लाख 48 हजार लोकांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे