मुंबई : आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, सोमवारी महाराष्ट्रात 8493 रूग्ण सापडले. राज्यात आता संक्रमितांची संख्या 6 लाख 4 हजार 358 झाली आहे. तर कोरोनामुळे 24 तासादरम्यान 228 रूग्णांचा मृत्यू झाला. यामुळे मृतांची संख्या वाढून 20 हजाराच्या पुढे गेली आहे. 24 तासात येथे 228 लोकांचा मृत्यू झाला. मुंबईत रिकव्हरी रेट 80.37% झाला आहे.
देशात कोरोना रूग्णांची एकुण संख्या 27 लाख
देशात कोरोना व्हायरसच्या रूग्णांची संख्या 27 लाख 2 हजार 743 झाली आहे. सोमवारी देशात 55079 नवे रूग्ण सापडले. 24 तासात 876 रूग्णांचा मृत्यू झाला. तर 47 हजार 979 लोक बरे झाले आहेत. भारतात कोरोना रूग्ण वाढण्याचा वेग जगात प्रथम क्रमांकावर आहे. काल अमेरिकेत 40,612 आणि ब्राझीलमध्ये 23,038 नवे रूग्ण सापडले होते.
देशात सध्या कोरोनाच्या 6 लाख 73 हजार 166 अॅक्टिव्ह केस आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत 51 हजार 797 रूग्णांचा जीव गेला आहे. तर, 19 लाख 77 हजार 780 रूग्ण बरे झाले आहेत.