मुंबई : लहानपणी बाहुलीशी खेळण्याची आवड तर सर्वच मुलांना असते. जवळपास सर्व मुले बाहुलीशी खेळतात. छोट्या मुलींसाठी तर बार्बी डॉल म्हणजे खास आकषर्ण असते. अगदी झोपतानाही त्यांना लाडक्या बाहुलीला जवळ घेतल्याशिवाय झोप येत नाही.
पण, अशीच खरीखुरी, जीवंत डॉल दिसली तर! होय, हे शक्य आहे. अशीच एक खरीखुरी डॉल जपानच्या टोकियो शहरात आहे. या सुंदर बाहुलीचे नाव आहे ससारा आओई (sasara aoi / Aoi Sasakura). ती जपानच्या टोकियो शहरातील शुबीया (shibuya, tokyo) येथे राहाते. तिचे मुळ गाव हक्काईडो आहे. या खर्याखुर्या बार्बी डॉलला पाहण्यासाठी जपानमध्ये सुद्धा गर्दी होते.
ती अगदी हुबेहुबे बाहुली सारखी रोज नटते आणि आपल्या चहत्यांना खुश करते. तिला गोल्फ खेळायला आवडते. तिची केस रचना, कपडे सर्वकाही बार्बी डॉलसारखे असते. तिचे डोळे टपोरे आणि पाणीदार आहेत. चेहर्याचा आकार बार्बी डॉलसारखा आहे. जपानची बार्बी डॉल ससारा आओईचे जगभरातही अनेक चाहते आहेत.