Delhi Blast : दिल्लीतील इस्रायल दूतावासाजवळ स्फोट; गुप्तचर विभाग, स्पेशल सेलकडून तपास सुरू

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील इस्त्राईल वाणिज्य दूतावासाजवळ हा स्फोट झाला आहे. या स्फोटात जीवितहानी झाल्याची माहिती नाही. स्फोटात 4 ते 5 गाड्यांचं नुकसान झालं आहे. जेथे स्फोट झाला तो भाग विजय चौकापासून दीड किलोमीटर लांब असल्याचं सांगितलं जात आहे. एपीजे अब्दुल कलाम रोडवर सायंकाळी 5 च्या हा ब्लास्ट झाल्याचे वृत्त सांगितले जात आहे.

या स्फोटात अद्याप कोणी जखमी झाल्याची माहिती नाही. इस्त्रायल दूतावास तुगलक रोड पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर आहे. दूतावासाजवळ काही वर्षांपूर्वी एका चालत्या इनोव्हा कारच्या खाली एक अज्ञात बाईक स्वार बॉम्ब फेकून फरार झाला होता. पोलिसांनी सांगितलं की, हा स्फोट इस्त्रायल दूतावासात झालेला नाही. त्याच्या जवळील बंगला क्रमांक 6 मध्ये ब्लास्ट झाला आहे. सध्या घटनास्थळी गुप्तचर विभाग, स्पेशल सेल आणि क्राईम ब्रांन्चचे अधिकारी तपास करीत आहेत.