GOLD : सोन्याची ‘शुद्धता’ कशी ओळखाल, जाणून घ्या काय आहे ‘हॉलमार्किंग’ आणि का आहे जरूरी

मुंबई : सरकारने सोन्याच्या शुद्धतेसाठी हॉलमार्किंग सेंटरची ऑनलाइन रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू केली आहे. पुढील वर्षापासून हॉलमार्क ज्वेलरीची विक्री अनिवार्य करण्यात आली आहे. यामुळे ग्राहक आणि व्यापार्‍यांना अडचणींपासून वाचवण्यासाठी हॉलमार्किग सेंटरच्या संख्येत वाढ केली जात आहे. याचे अनेक फायदे होतील. जाणून घेवूयात हॉलमार्किंग काय आहे आणि ते का जरूरी आहे? सोबतच हे सुद्धा जाणून घ्या की, सोन्याची शुद्धता कशी ओळखली जाते?

काय आहे हॉलमार्किंग
हॉलमार्क सरकारी गॅरंटी आहे. हॉलमार्कचे निर्धारण भारताची एकमेव एजन्सी ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड (बीआयएस) करते. हॉलमार्किंगमध्ये कोणत्याही उत्पादनाला ठरलेल्या मापदंडानुसार प्रमाणित केले जाते. भारतात बीआयएस ती संस्था आहे, जी ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या जाणार्‍या गुणवत्ता स्तराची तपासणी करते. सोन्याची नाणी किंवा दागिने कोणताही सोन्याचा दागिना जो बीआयएसद्वारे हॉलमार्क केला गेला आहे, त्यावर बीआयएसचा लोगो लावणे जरूरी आहे. यावरून समजते की, बीआयएसच्या लायसन्स प्राप्त प्रयोगशाळेत त्याच्या शुद्धतेची तपासणी करण्यात आली आहे.

हॉलमार्किंग केंद्राची सध्याची स्थिती

* सध्या देशभरात 234 जिल्ह्यात हॉलमार्किंगची 921 केंद्र
* हॉलमार्किंगसाठी 31 हजार ज्वेलर्सने केला आहे ऑनलाइन अर्ज
* हॉलमार्किंगच्या कक्षेत 5 लाख ज्वेलर्स येण्याची अपेक्षा
* 2 ग्रॅमपेक्षा कमी वजनाच्या ज्वेलरीवर हॉलमार्कची गरज नाही
* 3 मानक 14,18,22 कॅरेटच्या ज्वेलरीवर हॉलमार्क पुढील वर्षापासून अनिवार्य

हॉलमार्कची 5 प्रकारची ओळख

1. खर्‍या हॉलमार्कवर बीआयएसचे त्रिकोणी निशाण असते
2. त्यावर हॉलमार्किंग केंद्राचा लोगो असतो
3. सोन्याची शुद्धता लिहिलेली असते
4. ज्वेलरी निर्मितीचे वर्ष
5. उत्पादकाचा लोगो सुद्धा असतो

अशी ओळखा शुद्धता

* 24 कॅरेट शुद्ध सोन्यावर 999 लिहिलेले असते
* 22 कॅरेटच्या ज्वेलरीवर 916 लिहिलेले असते
* 21 कॅरेट सोन्यावर 875 लिहिलेले असते
* 18 कॅरेटच्या ज्वेलरीवर 750 लिहिलेले असते
* 14 कॅरट ज्वेलरीवर 585 लिहिलेले असते

जास्त महाग नसते हॉलमार्क ज्वेलरी
हॉलमार्कमुळे दागिने जास्त महाग होतात असे सांगून काही ज्वेलर्स विना हॉलमार्कचे दागिने घेण्यासाठी गळ घालतात. अशावेळी सावध व्हा. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, प्रति ज्वेलरी हॉलमार्कचा खर्च अवघा 35 रुपये येतो. सोने खरेदी करताना तुम्ही ऑथेंटिसिटी/प्युरिटी सर्टिफिकेट घ्यायला विसरू नका. सर्टिफिकेटमध्ये सोन्याचे कॅरेट गुणवत्ता सुद्धा चेक रून घ्या. सोबतच सोन्याच्या ज्वेलरीमध्ये लावलेल्या जेम स्टोनसाठी सुद्धा एक वेगळे सर्टिफिकेट जरूर घ्या.

का आहे जरूरी
ग्राहकांना बनावट उत्पादनांपासून वाचवणे आणि व्यवसायावर देखरेख ठेवण्यासाठी हॉलमार्किंग अतिशय जरूरी आहे. हॉलमार्किंगचा फायदा हा आहे की, जेव्हा तुम्ही हे विकण्यासाठी जाल तेव्हा कोणत्याही प्रकारची डेप्रिसिएशन कॉस्ट कापली जाणार नाही म्हणजे तुमच्या सोन्याची योग्य किंमत मिळेल. हॉलमार्किंगमध्ये उत्पादन अनेक टप्प्यातून जाते. यामुळे गुणवत्तेबाबत कोणतीही शंका राहात नाही. सोबतच बाजारात सोन्याच्या खरेदी-विक्रीवर देखरेख ठेवण्यास मदत होते. गरज भासल्यास तपास एजन्सीज अनेक संस्थांच्या अकाड्यांची पडताळणी करून गडबडीचा शोध घेऊ शकते.