पुणे : हिंदू जनजागृती समितीच्या वतीने सामाजिक जाणीव जोपासली जावी आणि समाजाला त्याचा अधिकाधिक लाभ व्हावा या उद्देश्याने आरोग्य तपासणी, मंदीर स्वच्छता, अन्नदान, शालेय साहित्य वाटप अश्या प्रकारचे सामाजिक उपक्रम नियमितपणे घेतले जातात. याचाच एक भाग म्हणून 21 जून या दिवशी मंगळवार पेठ गावठाण, पुणे येथे दु २ वाजता वारकऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.
यावेळी ‘हिंदू जनजागृती समिती’ न्यासाच्या वतीने 300 हून अधिक वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच त्यांना औषधेही देण्यात आली. काही जणांना पायाला जखमा ही झाल्या होत्या त्यांना ड्रेसिंग करून औषधे दिली. ही तपासणी डॉक्टर प्रज्ञा सीडाम आणि डॉक्टर प्राजक्ता बनकर यांनी केली.
तसेच 22 जून या दिवशी हिंदु जनजागृती समिती आणि महाराष्ट्र मंदिर महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने माऊलींच्या पालखीचे पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. याबरोबरच वारीमध्ये ख्रिस्ती मिशनरी बायबलचे वाटप करून प्रचार करत होते. यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी या संदर्भातील निवेदन पुरंदर तालुक्याचे विद्यमान आमदार विजयबापू शिवतारे यांना देण्यात आले.
यावेळी आमदार विजयबापू शिवतारे यांनी तातडीने डिसीपी राजकुमार शिंदे यांना फोन करून एफ आय आर दाखल करून कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. यावेळी ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील मानकरी सुध्दा आवर्जून उपस्थित होते.
***
Various activities on the occasion of Pandharpur Wari by Hindu Janajagruti Samiti!
Pune: Social activities like health check-up, temple cleanliness, food donation, school material distribution are regularly organized by Hindu Janajagruti Samiti with the aim of cultivating social awareness and benefiting the society more. As a part of this, a health check-up camp was organized for Warkaris on Tuesday, June 21 at 2 pm at Peth Gavthan, Pune.
On this occasion, more than 300 Warkaris were health checked by the ‘Hindu Janajagruti Samiti’ Trust. They were also given medicines. Some of them had wounds on their feet and were given medicines after dressing them. This check-up was done by Dr. Pragya Seedam and Dr. Prajakta Bankar.
Also, on June 22, the palanquin of Mauli was welcomed by showering flowers in the joint auspices of Hindu Janajagruti Samiti and Maharashtra Mandir Mahasangh. Along with this, Christian missionaries were distributing Bibles and preaching in Wari. A statement was given to the sitting MLA of Purandar taluka, Vijaybapu Shivtare, requesting strict action against them.
At this time, MLA Vijaybapu Shivtare immediately called DCP Rajkumar Shinde and instructed him to file an FIR and take action. At this time, the dignitaries of the Dnyaneshwar Maharaj palanquin ceremony were also present.
- news edited by ajay sonawane, editor / journalist