भारत सरकारने तातडीने पावले उचलून बांगलादेशी हिंदूंना संरक्षण द्यावे
पुणे : बांगलादेशात हिंदूंवरील आक्रमणे, हत्या, लुटालुट, महिलांवरील आणि लहान मुलांवरील अत्याचार, बलपूर्वक विस्थापन, मंदिरांचा विध्वंस यांमध्ये भयावह वाढ झाली आहे. आजही बांगलादेशमध्ये हिंदूंची अवस्था चिंताजनक आहे. त्यामुळे बांगलादेशी हिंदूंच्या सुरक्षेसाठी भारत सरकारने तातडीने पावले उचलावीत या मागणीसाठी बालगंधर्व रंगमंदिर जवळ, जंगली महाराज रस्ता, पुणे येथे 5 जानेवारी 2025 या दिवशी दुपारी 4 वाजता हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन घेण्यात आले.
भारत सरकारने बांगलादेशी हिंदूंच्या सुरक्षेसाठी तातडीने पावले उचलावी, तसेच यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर आवाज उठवावा अशीही मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी विविध घोषणा लिहिलेले प्लाकार्ड हातात घेऊन साखळी आंदोलन केले. यावेळी वारकरी संघटना, गोरक्षक, महाराष्ट्र मंदिर महासंघ, रणरागिणी शाखा अश्या विविध हिंदुत्वनिष्ट संघटनांचे प्रतिनिधी आणि नागरिक उपस्थित होते. 250 हून अधिक संख्येने आंदोलनाला उपस्थिती लाभली.
‘संधे शक्ती कलौयुगेः’, ‘बांगलादेशमधील हिंदूंचे रक्षण करा त्यांना संरक्षण द्या’, ‘बांगलादेशी घुसखोर हाकला, देश वाचवा !’ ‘बांगलादेशी उत्पादनांवर बहिष्कार घाला ।’, ‘बांगलादेशी हिंदूंवर होत असलेले अत्याचार रोखण्यासाठी हिंदूंनो जागृत व्हा !’, ‘हिंदूवर आक्रमण करणाऱ्या, मंदिरावर हल्ला करणाऱ्या बांगलादेशचा धिक्कार असो ।’ अश्या प्रकारच्या घोषणा लिहून हातात घेतलेले पला कार्ड अनेकांचे लक्ष वेधून घेत होते.
हिंदूंवरील हे अत्याचार रोखले नाही, तर त्याचे लोण भारतात येण्यास वेळ लागणार नाही; म्हणून भारत सरकारकडून कठोर भूमिका आणि निर्णायक पावले उचलण्याची अपेक्षाही समितीने यावेळी व्यक्त केली आहे.