पेण : मध्य रेल्वे गणेशोत्सवादरम्यान होणारी चाकरमान्यांची गर्दी लक्षात घेऊन 162 स्पेशल ट्रेन चालवणार आहे. या गाड्यांसाठी तिकिट बुकिंग 15 ऑगस्टपासून सुरू झाले आहे. रेल्वेने पेण टाइम्सला दिलेल्या माहितीनुसार, गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्या प्रवाशांच्या सुविधेसाठी गणेश स्पेशल ट्रेन चालवल्या जाणार आहेत. कोकणात गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. ज्यामुळे मोठ्या संख्येने चाकरमानी रेल्वेने प्रवास करतात.
पेण टाइम्सशी बोलताना रेल्वेच्या अधिकार्याने सांगितले की, कोकणसाठी चालवल्या जाणार्या ट्रेन मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सुटतील. या ट्रेन सावंतवाडी, कुडाळ आणि रत्नागिरीपर्यंत जातील.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि सावंतवाडी रोड, कुडाळ आणि रत्नागिरीच्या दरम्यान एकुण 162 स्पेशल ट्रेन चालवण्याची तयारी केली गेली आहे. या ट्रेनच्या प्रवासासाठी रिझर्व्हेशन करणे जरूरी असणार आहे आणि प्रवाशांना प्रवासादरम्यान कोविड 19 च्या सर्व नियमांचे पालन बंधनकारक असणार आहे.
सर्व ट्रेनचे वेळापत्रक
* ट्रेन नंबर 01101 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून 22 ऑगस्टपर्यंत दररोज 23.05 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी 09.30 वाजता सावंतवाडी रोडला पोहचेल.
* ट्रेन नंबर 01102 सावंतवाडी रोडहून 23.8.2020 पर्यंत दररोज 10.10 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 21.40 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहचेल.
या ट्रेन दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड़, चिपळुण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अदावली, राजापुर रोड, वैभववाड़ी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळवरून जातील.
* ट्रेन नंबर 01105 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून 22 ऑगस्टपर्यंत दररोज 22.00 वाजता निघेल आणि दुसर्या दिवशी 08.10 वाजता सावंतवाडी रोडला पोहचेल.
* ट्रेन नंबर 01106 सावंतवाडी रोडहून 23 ऑगस्टपर्यंत दररोज 08.50 वाजता निघेल आणि त्याच दिवशी 20.05 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहचेल.
या ट्रेन दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळुण, सावर्डे, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, विलावडे, राजापुर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळवरून जातील.
* ट्रेन नंबर 01113 लोकमान्य टिळक टर्मिनसहून 24.8.2020 पासून 5.9.2020 पर्यंत दररोज 05.30 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 15.50 वाजता सावंतवाडी रोडला पोहचेल.
* ट्रेन नंबर 01114 सावंतवाडी रोडहून 24.8.2020 ते 5.9.2020 पर्यंत दररोज 17.30 वाजता निघेल.
या ट्रेनने प्रवास करण्यासाठी रिझर्व्हेशन सेंटरशिवाय IRCTC ची अधिकृत वेबसाइट आधिकृत वेबसाइट www.irctc.co.in वरून तिकिट बुक करता येईल.