PHOTO : पुणे येथे ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे विविध क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रण

पुणे : सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा 83 वा जन्मोत्सव आणि सनातन संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष यानिमित्ताने गोवा येथे 17 ते 19 मे 2025 या कालावधीत होणार्‍या भव्य ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे निमंत्रण पुणे येथे विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मान्यवरांना देण्यात येत आहे.
1. या अंतर्गत २० एप्रिल या दिवशी हे निमंत्रण भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णीं यांना देण्यात आले. या वेळी पराग गोखले आणि कु. क्रांती पेटकर यांनी मेधा कुलकर्णीं यांची भेट घेतली आणि त्या करत असलेल्या कार्यासाठी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

2. 20 एप्रिल या दिवशी विश्‍व हिंदु परिषदेचे अखिल भारतीय सत्संग सहप्रमुख दादा वेदक यांनाही ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे निमंत्रण देण्यात आले. या वेळी कृष्णाजी पाटील आणि बाळकृष्ण घोरपडे हे उपस्थित होते.

3.तसेच प्रसिद्ध बासरीवादक, महामहोपाध्याय, डॉ पं पू केशव गिंडे यांना आणि प्रसिध्द शास्त्रीय गायक पं संजय गरुड यांना डॉ. ज्योती काळे यांनी शंखनाद महोत्सवाचे निमंत्रण दिले.

4. प्रसिद्ध शास्त्रीय गायक पं विकास कशाळकर यांना चैतन्य तागडे यांनी शंखनाद महोत्सवाचे निमंत्रण दिले.
खासदार मेधा कुलकर्णी यांनी काढलेले गौरवोद्गार आणि केलेले आवाहन –
यावेळी सनातन संस्थेच्या 25 वर्षांतील कार्याविषयी मेधा कुलकर्णीं यांना माहिती देण्यात आली. सनातन संस्थेचे कार्य ऐकल्यावर मेधा कुलकर्णीं म्हणाल्या की, सनातन संस्थेचे मी मनापासून हार्दिक अभिनंदन करते आणि त्यांना या महोत्सवासाठी शुभेच्छा देते. ‘संघटन मे शक्ती है’ या शक्तीचा आपण उपयोग करूया आणि आपले राष्ट्र पुन्हा एकदा मूळ सनातन विचारधारेवर आणण्यासाठी प्रयत्न करूया त्यासाठी आपल्या सगळ्यांना एकत्र येण्याची आवश्यकता आहे.
आणि हे महान कार्य सनातन संस्थेच्या वतीने होत आहे. या कार्यासाठी सर्वांचे खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक, सामाजिक, राजकीय पाठबळ आवश्यक आहे. अध्यात्मातील, राजकीय क्षेत्रातील तसेच आपापल्या क्षेत्रांमध्ये ज्यांनी उत्तुंग असे कार्य केले आहे अशी अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी येणार आहेत. आपल्या सगळ्यांशी चर्चा, विचार विनिमय करणार आहेत. यासाठी आपण सर्व हिंदू बांधवांनी या महोत्सवाला आवर्जून मोठ्या संख्येने उपस्थित राहूया.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *