IPLचे शेड्यूल जाहीर, 19 सप्टेंबरला अबुधाबीत चेन्नई-मुंबई सामना रंगणार

मुंबई : आयपीएल 2020 चे शेड्यूल आज जाहीर करण्यात आले. 13 व्या सीझनची सुरूवात 19 सप्टेंबरला अबुधाबीत होणार आहे. मुंबई इंडियन्स (एमआय) आणि चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) यांच्यात उद्घाटनाचा सामना होईल. रविवार 20 सप्टेंबरला दुबईत दिल्ली कॅपिटल्स आणि किंग्स इलेव्हन पंजाबमध्ये सामना होईल.

असे आहे शेड्यूल

* सोमवार 21 सप्टेंबरला सनरायजर्स हैद्राबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु हे दुबईत भिडतील.

* मंगळवार 22 सप्टेंबरला शारजाहमध्ये राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सामना होईल.

* दुबईत आयपीएलच्या सर्वात जास्त 24 मॅच खेळल्या जातील.

* अबुधाबीत 20 मॅच आणि शारजाहमध्ये 12 मॅच खेळवण्यात येतील.

* प्लेऑफ आणि फायनलच्या सामन्यांचे ठिकाण नंतर जाहीर करण्यात येईल.

* संयुक्त अरब अमीरात (युएई) च्या तीन ठिकाणी दुबई, अबुधाबी आणि शारजाहमध्ये आयपीएलचे आयोजन.

* टूर्नामेंट 19 सप्टेंबरपासून सुरू होऊन 53 दिवस चालेल.

* आयपीएल फायनल 10 नोव्हेंबरला होईल.

* आयपीएलचे 10 डबल हेडर (एका दिवसात दोन मॅच) सामाने खेळवले जातील.

* दिवसाचे सामने आता दुपारी 3:30 वाजता सुरू होतील.

* सायंकाळचे सामने 7:30 वाजता सुरू होतील.