karanjade grampanchayat election- 2022 : करंजाडे ग्रामपंचायतीत महाविकास आघाडीत तरुणांची फौज मैदानात

karanjade
करंजाडे (संजय कदम) :  राजकारणातील प्रवेशाची पहिली पायरी म्हणजे ग्रामपंचायत निवडणूक समजली जाते. त्यातच आता निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीचा रंग चढू लागला आहे. विशेष अतिशय चुरशीची लढत असलेल्या करंजाडे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडे दिवसेंदिवस तरुणांचा कल वाढत दिसत असल्याने विजयाचा गुलाल महाविकास आघाडीचाच उडविणार असा विश्वास उमेदवारांकडून केला जात आहे.
सरपंच निवड थेट जनतेतून केली जाणार असल्याने ग्रामपंचायत निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. यंदाच्या निवडणुकीत युवकांचा मोठा सहभाग दिसून येत आहे. गावावर राजकीय वर्चस्व कोणाचे? यासाठी गावस्तरावर युवकांची चाचपणी सुरू आहे. त्याचबरोबर ग्रामपंचायतींसाठी येत्या 18 डिसेंबरला मतदान होणार आहे. त्यानुसार करंजाडे ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, निवडणूक गावाची असली तरी यात महाविकास आघाडीच्या नेत्यांची कसोटी लागत असल्याने मोठ्या नेत्यांचेही लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.
करंजाडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांच्यासह माजी उपसरपंच योगेंद्र कैकाडी हे निवडणुकीमध्ये उभे राहिले आहे. रामेश्‍वर आंग्रे – थेट सरपंचपदाचे उमेदवार प्रभाग 1 – अंजना शिवाजी कातकरी, योगेंद्र दत्ताराम कैकाडी, प्रभाग 2 – अक्षय मोहन गायकवाड, उमेश शंकर भोईर , कोमल रवी खिलारे, प्रभाग, प्रभाग 3 – श्रुती निलेश गायकवाड , नीता योगेश राणे, रुपेश बबन आंग्रे, प्रभाग 4 – कल्पना विनेश गायकर ,नीलम मोहन भगत, ध्रुव रामचंद्र बोरकर हे उमेदवार निवडणूक रिंगणात उभे राहिले आहेत.
महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांकडून सरपंच पदाचे उमेदवार रामेश्वर आंग्रे यांच्या उमेदवारांना मार्गदर्शन करीत आहेत. यावेळी तरुणांची फौज मैदानात उतरली आहे. त्यानुसार प्रचाराला जोरदार सुरुवात केली असून आता घरोघरी जाऊन मतदाराच्या भेटी-गाठी घेण्याचे सुरु असून मतदारांकडून महाविकास आघाडीच्या विजयाचा गुलाल उधळणार असल्याच्या प्रतिक्रिया देण्यात येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *