कर्जत (गणेश पवार) : कर्जत : – कर्जत तालुक्यातील मौजे कडाव येथिल तरूणावर पाच चेहरेबंद तरूणांकडून जिव घेणा हल्ला झाला असल्याची घटना घडली असुन, सदर घटना ही राजकीय वैमान्यशातून झाल्याचे बोलले जात आहे. तर सदर हल्ल्यात जखमी झालेल्या तरूणाचे नांव हे रातिश पवार असे आहे.
मौजे कडाव येथिल तरूण रतिश पवार याला आलेल्या फोननुसार कडाव येथिल नाक्यावर बोलावल्या प्रमाणे रतिश पवार हा नाक्या ठिकाणी आला असता, रतिश याला चेहरेबंद पाच तरुणांनी दुपारचे अंदाजे २.०० ते ३.०० वाजण्याचे सुमारास आड बाजूस नेऊन फावडा व पिकाऊ यांच्या डांडक्याचे साह्याने जीव घेणा हल्ला करून, सदर चेहरेबंद तरूणांनी घटना स्थळावरून पळ काढून गेले. पळ काढलेले चेहरेबंद तरुणांपैकी तीन तरूण हेे बाहेर ग़ावातील तर दोन हे कडाव गावातील असल्याचे ही बोलले जात आहे.
हल्ल्यात गंभिर जखमी झालेल्या रतिश पवार याला उपचारासाठी स्थानिक तरूणांनी उपजिल्हा रुग्णालय कर्जत येथे दाखल केले असता. गंभिर स्वरूपाची दुखापत असल्याने त्याला पुढील उपचारासाठी पनवेल येथिल रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हल्ला हा राजकीय वैमान्यशातून झाल्याचे बोलले जात असुन, रतिश पवार हा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा कार्यकर्ता असल्याचे बोलले जात असल्याने, सदर हल्ला हा वैयक्तिक की राजकीय वादातून झाला आहे का? असा प्रश्न उपस्थित होत असुन, तशी दबक्या आवाजात चर्चा देखिल सुरू आहे.
रतिश पवार यांच्या वर झालेल्या जिवघेणा हल्ल्याने कडाव गावातील वातावरण हे सध्या तापले असुन, सदर या हल्ल्या प्रकरणी कर्जत पोलिस हे अधिक तपास करीत आहेत.