KARJAT : केवळ 36 तासात पोलिसांनी लावला कशेळे येथील राजेंद्र ज्वेलर्स मालकाच्या खुनाचा छडा

kashele
कर्जत (गणेश पवार) : कर्जत तालुक्यातील कशेळे येथील राजेंद्र ज्वेलर्स चे मालक हरिष उर्फ हरिसिंग माधोसिंग राजपुत यांचा कशेळे नेरळ रस्त्यावर बाईक ला अपघात घडवून खून करण्यात आला होता. ३ डिसेंबर रोजी रात्री खून करून पसार झालेल्या आरोपीयांना पोलिसांच्या पाठवणे आव्हानात्मक गुन्ह्यात अटक केली आहे.
.03/12/2022 रोजी हरिष राजपुत हे घरी वेळेत न पोहोचल्याने त्यांची पत्नी आणि नातेवाईक नेरळ पोलीस ठाण्यात माहीती देण्यास आल्यानंतर नेरळ पोलीसांनी रात्रीचे वेळी नेरळ-कशेळे रस्त्यावर शोध घेत असताना मौजे जिते गावचे हद्दीत रस्त्याचे बाजूला गवतामध्ये एक बजाज डिस्कव्हर मोटर सायकल पडलेली दिसून आल्याने पोलीसांनी जवळ जावून पाहीले असता ज्वेलर्स व्यवसायिक हरिष राजपुत हे मयत अवस्थेत शेतामध्ये पडलेले मिळून आले व त्यांचेपोटावर, छातीवर, मानेवर, डावे पायावर व हातावर धारदार हत्याराने वार करून जिवेठार मारल्याचे दिसून आले म्हणून सदरबाबत नेरळ पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं.359/2022 भादंविसं कलम 302 प्रमाणे दि.04/12/2022 रोजी 09.27 वा.गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
सदर गुन्हयाचे घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक.अतुल झेंडे,उपविभागीय पोलीस अधिकारी.विजय लगारे यांनी भेट देवून गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून गुन्हा उघडकीस आणण्याकरीता वेगवेगळे चार पथके निर्माण केली.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक.दयानंद गावडे व त्यांचे पथक यांनी तांत्रिकदृष्टया, सी.डी.आर.चे अवलोकन आणि सी.सी.टि.व्ही.फुटेजच्या आधारे कौशल्यपूर्ण तपास करून 36 तासाचे आत आरोपी कर्जत तालुक्यातील सावळे येथील जनार्दन विठ्ठल कराळे, रोशन लक्ष्मण धुळे यांना ताब्यात घेवून त्यांचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने सखोल चैकशी केली असता विरार येथील 4 साथीदार यांच्यासह गुन्हा केल्याची कबुली दिली असता त्यांना 07/12/2022 रोजी अटक करण्यात आलेली आहे. त्यानंतर नेरळ पोलीस ठाण्याचे पथकातील पोलीस उपनिरीक्षक.श्रीकांत काळे आणि त्यांचे पथक यांनी विरार येथे राहणारे गुन्हयातील आरोपी सनी मनमोहन गिरी,सुरज दिपक जाधव,तानाजी बाबुराव चैगुले यांना शिताफीने विरार येथे ताब्यात घेवून त्यांना दि.09/12/2022 रोजी अटक करण्यात आलेली आहे.
त्यानंतर त्यांचा साथीदार छगनाराम भिमारामजी पटेल हा सोलापूर येथे असल्याची माहीती मिळताच नमुद आरोपी यास नेरळ पोलीस ठाण्यातील सहायक.फौजदार गिरी,पोलीस हवालदार म्हात्रे,पोलीस शिपाई बारगजे यांनी सोलापूर येथून ताब्यात घेवून नेरळ पोलीस ठाणे येथे आणले होते. त्यास अटक केल्यानंतर कशेळे येथील ज्वेलर्स मालक हरीश राजपूत यांचा खून करणारी सर्व आरोपींना आव्हानात्मक गंभीर गुन्हयाचा तांत्रिकदृष्टया जलद गतीने तपास करून गुन्हयातील सर्व 6 आरोपी यांना अटक करण्यात आलेली आहे.
त्याचप्रमाणे गुन्हयातील मयत व्यक्तीची बॅग, मोबाईल फोन, आरोपी यांनी गुन्हा करतेवेळी वापरलेली स्कुटी व काळया रंगाची झायलो कार असे वाहन जप्त करण्यात आलेले असून सदरचा गुन्हा कट रचून खुनासह दरोडा असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने गुन्हयात भादंविसं कलम 396,120ब हे कलम लावण्यात आले होते.
या गुन्हयाचा पुढील तपास नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक.राजेंद्र तेंडुलकर हे करीत आहेत. या गंभीर गुन्हयाचा पोलीसांनी 36 तासात छडा लावणेकामी. जिल्हा पोलीस अधीक्षक.सोमनाथ घार्गे,अपर पोलीस अधीक्षक.अतुल झेंडे,उपविभागीय पोलीस अधिकारी.विजय लगारे यांचे मार्गदर्षनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, रायगड अलिबागचे पोलीस निरीक्षक.दयानंद गावडे, पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडूलकर, सपोनि .नागेश कदम, पो.उप.निरी.महेश कदम, श्रीकांत काळे, स्थागुअ.शाखे कडील सहा.फौज. दिपक मोरे, पोहवा. राजेश पाटील, यशवंत झेमसे, अमोल हंबीर,प्रतीक सावंत,प्रशांत दबडे, राकेश म्हा़त्रे तसेच नेरळ पोलीस ठाणे कडील सहा.फौज.गणेश गिरी,पोहवा.शकद फरांदे, निलेश वाणी, पो.ना. घनशाम पालवे, भाउ आघाण नेरळ पोलीस ठाणे तसेच अक्षय पाटील सायबरसेल यांनी चांगली कामगिरी केलेली आहे.
सदरचा गुन्हा हा सावळे येथील स्थानिक राहणारे आरोपी जनार्दन विठ्ठल कराळे,रोशन लक्ष्मण धुळे यांनी कशेळे येथील राजेंद्र ज्वेलर्स दुकान लुटण्याचे उद्देशाने सोलापूर येथील राहणारा आरोपी छगनाराम भिमारामजी पटेल याला टिप देवून त्याचे विरार येथील साथीदार आरोपी सनी मनमोहन गिरी, सुरज दिपक जाधव, तानाजी बाबुराव चौगुले साथीदार यांचेसह गुन्हेगारी कट रचून सदरचा गुन्हा केलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *