काइन मास्टर ॲप हे सर्वोत्कृष्ट विनामूल्य व्हिडिओ एडिटिंग ॲप आहे. यामधून आपण आपल्या व्हिडिओचे प्रत्येक फ्रेम वेगवेगळ्या बाजूने बघू शकतो, तसेच त्यामध्ये एडिटींग, नवीन पिक्चर किंवा व्हिडिओ आपण ऍड करू शकतो यामध्ये आपण Reverse, blend, cut, आणि high quality music तयार करू शकतो. KineMaster आणि त्याची सर्व tools वापरण्यास मोफत आहेत. यात 4K रिझोल्युशन पर्यंतच्या व्हिडिओ तयार होतो.
आपला व्हिडिओ कोणत्या सोशल मीडिया साईटवर पोस्ट करायचा आहे. त्यानुसार आपण त्याची फ्रेम निवडू शकतो. उदाहरणार्थ YouTube, फेसबुक पोस्ट आणि स्टोरीज, इन्स्टाग्राम पोस्ट आणि स्टोरीज अशाप्रकारे आपण निवडू शकतो.
यामधून आपले व्हिडिओ उलट करणे,आश्चर्यकारक बनवणे, त्याला सुंदर इफेक्ट देणे अशा बऱ्याच गोष्टी या मधून आपण करू शकतो.
त्याचबरोबर यामधून आपण रेकॉर्ड केलेला व्हॉइस किंवा म्युझिक जोडू शकतो. आपण या मधून व्हिडिओ ट्रिम करणे, विभाजन करणे आणि क्रॉपही करू शकतो.महत्त्वाचे म्हणजे आपण त्या व्हिडिओचा टाइमिंग आपल्याला फास्ट किंवा स्लो करू शकतो.
व्हिडिओ असा करा एडिट
१.सर्वप्रथम प्ले स्टोर वरून KineMaster हे ॲप इन्स्टॉल करून घ्यावे.
https://play.google.com/store/apps/details?id=com.google.android.apps.fitness
२. ॲप ओपन झाल्यावर तेथे स्टार्ट बटनावर क्लिक करावे.
३. आपल्याला डाव्या बाजूला काही चिन्ह दिसतील त्यामध्ये प्लस चिन्ह वर क्लिक करावे.
४. आपल्याला आपल्या व्हिडिओची फ्रेम साईज् किती हवी आहे, ते तिथे आपण सिलेक्ट करावी.
५. आपल्या फोन मधील व्हिडिओ तसेच पिक्चर्स सिलेक्ट करण्यासाठी दाखवले जातील. तेथे आपण आपल्याला हवा असलेला व्हिडीओ किंवा पिक्चर सिलेक्ट करावा .
६. सिलेट केलेला व्हिडिओ आपल्याला तेथे दिसेल त्याचबरोबर त्याखाली तो व्हिडिओच्या प्रत्येक लेअर तयार झालेल्या आपल्याला दिसतील.
७. डावीकडील टूल्स मधून आपण त्या व्हिडिओमध्ये आपल्याला हवं तसं एडिटिंग करू शकतो.
८. एखादा नवीन पिक्चर किंवा व्हिडिओ तसेच साऊंड ॲड करू शकतो.
९. व्हिडिओ एडिट झाल्यावर डाव्या बाजूला वरती कोपऱ्यात एक्सपोर्ट बटनावर क्लिक करुन आपला व्हिडिओ आपण इतरांशी शेअर करू शकतो.
अशाप्रकारे आपले स्वतःचे आश्चर्यकारक व्हिडिओ तयार करण्यासाठी काइनमास्टर डाउनलोड करा आणि आजच वापरून बघा.