कर्जत (गणेश पवार) : कर्जत येथे दोन गावठी पिस्तुल चार जिवंत काडतुस जप्त करण्यात आली आहेत.तर कर्जत भिसेगाव येथील राहणारा आरोपी यशबीर नरेश चव्हाण याला देखील ताब्यात घेण्यात आले आहे. ही दमदार कामगिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग LCB च्या पथकाने केली आहे.
गुरुवार 1 डिसेंम्बर रोजी LCB चे अधिकारी राजेश पाटील यांना त्यांच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार गावठी पिस्तुल विकण्यासाठी एक इसम कर्जत चार फाटा येथे येणार असल्याची माहिती देण्यात आली होती. त्या अनुषंगाने राजेश पाटील यांनी रायगड पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे व अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचला होता.
दरम्यान यावेळी कर्जत भिषेगाव येथील फातिमा नगर येथे राहणारा आरोपी यशबीर नरेश चव्हाण याच्याकडे अधिकाऱ्यांना दोन गावठी पिस्तुल चार जिवंत काडतुस असे 57 हजार किमतीचा मुद्देमाल सापडून आल्याने आरोपी यशबीर चव्हाणला ताब्यात घेण्यात आले होते. दरम्यान त्याच्यावर कर्जत पोलीस ठाण्यात शस्ञ अधिनियम कायदा क. 3(1) 25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यशबीर चव्हाणवर आजवर कर्जत पोलीस ठाण्यात तर पुणे येथील पिंपरी पोलीस ठाणे तसेच भोसरी पोलीस ठाणे येथे विविध कलमाखाली गुन्हे दाखल असल्याची माहिती आता समोर आली आहे.
दरम्यान ही कारवाई दयानंद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली धनाजी साठे, राजा पाटील, यशवंत झेमसे,जितेंद्र चव्हाण, विकास खैरनार, तर चालक देवराम कोरम या पथकाने केली होती. कर्जत तालुक्यात LCB च्या पथकाकडून आजवर असे अनेक गंभीर गुन्हे हे वेळीच उघड करून आरोपींना ताब्यात देखील घेतल्याने त्यांचे सर्वस्थरातून कौतूक होत आहे.