नवी दिल्ली : भारत आज आपला 74 वा स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून आज तिरंगा फडकावून या ऐतिहासिक प्रसंगी देशवासियांना संबोधित करत आहेत. दरम्यान, मोदींनी ट्विटरवरून सर्व देशवासीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान सकाळी सात वाजता राजघाट येथे जातील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना श्रद्धांजली अर्पण करून तेथून थेट लाल किल्ल्यावर पोहोचले. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि संरक्षण सचिव डॉ. अजय कुमार यांनी पंतप्रधानांचे कार्यक्रमस्थळी पोहोचल्यावर स्वागत केले.