महाड : महाडमधील तारीक गार्डन इमारत दुर्घटनेत मरण पावलेल्या प्रत्येक मृतांच्या वारसांना 5 लाख रुपयांची शासकिय मदत देण्याची घोषणा, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज महाडमध्ये केली.
या दुर्घटनेत इमारतीतील कुटुंबीयांनी आपले सर्वस्व गमावले आहे, याउप्परही या कुटुंबाना आणखी आर्थिक मदत करण्याबाबत उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतला जाईल, असे सुतोवाच ना. वडेट्टीवार यांनी केले. याबाबत दुर्घटनाग्रस्त कुटुंबांना खास बाब म्हणून शासनाने आर्थिक मदत द्यावी, असा आग्रह माजी आ. माणिक जगताप यांनी वडेट्टीवार यांच्याकडे केला आहे. यावेळी त्यांच्यासमवेत माणिक जगताप उपस्थित होते.