भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्याची एकमुखी मागणी करा : पराग गोखले, हिंदु जनजागृती समिती

हडपसर : हलाल जिहाद,लव्ह जिहाद, वक्फ बोर्ड, घुसखोरी असे अनेक प्रश्न आणि समस्या आज संपूर्ण देशात आहेत. हिंदूंना शाळेत धर्मशिक्षण दिले जात नाही, अन्य धर्मियांना मात्र शाळेत धर्मशिक्षण दिले जाते. 100 कोटी हिंदूंचे एकही हिंदु राष्ट्र नाही, त्यासाठी धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र असले पाहिजे यासाठी जोरदार मागणी करायला हवी, हे होत नाही कारण स्वीकारलेले सेक्युलरीझम. यासाठी आपल्या सर्वाना भारत हे हिंदुराष्ट्र होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत असे परखड मत हिंदु जनजागृती समितीचे पराग गोखले यांनी व्यक्त केले.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील श्री राधाकृष्ण मंदिर, गोशाळा, तुकाई टेकडी पायथा, तुकाई दर्शन, काळेपडळ येथे 26 जानेवारी या दिवशी हिंदु राष्‍ट्र जागृती सभा पार पडली. त्यावेळी त्यांनी प्रमुख वक्‍ता म्‍हणून मार्गदर्शन केले. या सभेला 180 हून अधिक धर्मप्रेमी उपस्‍थित होते.

सभेचे आयोजन, प्रसार हे हडपसर येथील सियाराम मंदिर शाखेतील सदस्यांनी उत्स्फूर्तपणे केले. प्रसार सेवेसाठी 8 दिवस प्रतिदिन या भागात एकत्रितपणे प्रसार केला.घरोघरी जाऊन सभेचे निमंत्रण दिले. हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे सचिन घुले हेही यावेळी सहभागी झाले होते. यावेळी सनातन निर्मित अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म विषय ग्रंथ प्रदर्शन लावले होते त्यालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
मंदिर वेळोवेळी उपलब्ध करुन देणारे सुधीरचंद्र जगताप यांनी मंदिर उपलब्ध करून दिले आणि धर्मप्रेमी सुरज झांबरे यांनी चहा पानाची व्यवस्था केली याबद्दल समितीने त्यांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *