MPSC परीक्षा पुढे ढकलली : राज्य लोकसेवा आयोगाचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई :  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने  13 सप्टेंबर रोजी होणारी MPSC ची  परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.  कारण त्याच दिवशी   ‘नीट’ ची  परीक्षा असल्या मुळे यावेळी  तिसऱ्यांदा MPSC परीक्षा पुढे ढकलली आहे. तसे  MPSC ने अधिकृत पत्रक काढून हा महत्त्वाचा निर्णय जारी केला आहे.

परीक्षा केव्हा होणार आहेत, त्या बाबतचा अजून पर्यत कोणताही निर्णय झालेला नाही असे सूत्रांकडून समजले. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने तसेच उमेदवार व परीक्षा आयोजनातील कर्मचारी यांच्या सुरक्षेसाठी आयोगाकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत असल्याचं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सांगण्यात आलं आहे.