नवी दिल्ली : NCC च्या विद्यार्थ्यांकडे मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा केली आहे. दिल्लीच्या करियप्पा ग्राऊंड येथे पंतप्रधान मोदी यांनी एनसीसीच्या विद्यार्थ्यांना संबोधित केले.
गेल्या वर्षी 15 ऑगस्टला पंतप्रधान मोदी यांनी घोषणा केली होती की, कोस्टल आणि सीमाभागातील जवळपास 175 जिल्ह्यांमध्ये एनसीसीला नवी जबाबदारी दिली जाईल. त्यासाठी लष्कर, नोसेना आणि वायुसेनाद्वारे जवळपास 1 लाख एनसीसी कॅडेट्सना प्रशिक्षित केले जात आहे.
करियप्पा ग्राऊंड येथे एनसीसीची रॅली काढण्यात आली. या कार्यक्रमाच्या प्रारंभी पंतप्रधान मोदी यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि सैन्याच्या तिन्ही दलांचे प्रमुख उपस्थित होते. त्यावेळी पंतप्रधान मोदी यांनी एनसीसी कॅडेट्सना संबोधित केले.
महापूर किंवा अन्य आपत्कालीन परिस्थितीत एनसीसी कॅडेटस्नी लोकांची मदत केली आहे. करोना काळातही कॅडेट्सनी समाजसेवा करुन प्रशासनाची मदत केली. जगभरातील सर्वात मोठ्या यूनिफॉर्म यूथ ऑर्गनायझेशनच्या रुपात एनसीसी प्रत्येक दिवशी अधिक मजबूत होत आहे. शौर्य आणि सेवाभाव, तसेच भारतीय परंपरा जिथे रुजवण्यात येत आहे. तिथ एनसीसी कॅडेट दिसून येतात, अशा शब्दात मोदींनी कौतुक केले.
करोना काळात लाखो एनसीसी कॅडेट्सनी देशभरात ज्या प्रकारे प्रशासन आणि समाजासोबत मिळून काम केले ते प्रशंसनीय आहे. आपल्या संविधानात सांगितलेली नागरिकांची कर्तव्ये पार पाडणे ही सर्वांची जबाबदारी आहे.
सरकारने एनसीसीची भूमिका व्यापक बनवण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या सीमा, जमीन आणि समुद्र दोन्ही जोडण्यासाठी एनसीसीची भागिदारी वाढवण्यात येत आहे. कोस्टल आणि सीमाभागात तिन्ही सैन्यदल जवळपास 1 लाख एनसीसी कॅडेट्सला प्रशिक्षित केले जात आहे. यात एक तृतियांश आमच्या मुली आहेत, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.