श्री हनुमान जयंतीनिमित्त देशभरात 500 ठिकाणी, तर पुणे जिल्ह्यात 116 ठिकाणी सामूहिक गदापूजनाचा कार्यक्रम

हिंदूंमधील शौर्य व सामर्थ्य वाढवण्यासाठीच गदापूजन – पराग गोखले, हिंदु जनजागृती समिती
पुणे : अयोध्येत स्थापन झालेले श्रीराममंदिर ही एकप्रकारे रामराज्याची सुरुवात असून आता रामराज्य सर्वत्र स्थापन व्हावे आणि हिंदू समाजातील शौर्य जागृत होण्यासाठी आज श्री हनुमान जयंतीच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि भाविक यांच्या सहभागाने देशभरात 500 ठिकाणी सामूहिक ‘गदापूजन’ करण्यात आले.

पुणे जिल्ह्यात मंचर, वडगाव काशिंबे, पिंपळगाव खडकी, भुकूम खाटपेवाडी, सदाशिव पेठ, पुणे; सातारा रस्ता, आळंदेवाडी, मंचर गोकर्णेश्वर मंदिर, शनिवार वाडा, सिंहगड रस्ता येथील शिवकाशीनर्मदेश्वर मंदिर, आंबेगाव, तळेगाव दाभाडे, सोरतापवाडी, हडपसर; शेवाळवाडी आदी एकूण 116 पेक्षा अधिक ठिकाणी सामूहिक गदापूजनाचे कार्यक्रम घेण्यात आले. यात विशेषत: युवकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या निमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमांचा लाभ 6600 जणांनी घेतला.

या कार्यक्रमांची सुरुवात शंखनादाने झाली. त्यानंतर सामूहिक प्रार्थना, ‘गदापूजन’ विधी, श्री हनुमानाची आरती, मारुति स्तोत्रपठण केल्यानंतर ‘श्री हनुमते नम:’ हा सामूहिक नामजप करण्यात आला. या वेळी ‘रामराज्याच्या स्थापनेसाठी मारुतीरायांचे गुण कसे आत्मसात करावेत’ याविषयी मार्गदर्शनही करण्यात आले.

कार्यक्रमाच्या शेवटी ‘रामराज्याच्या स्थापनेसाठी सामूहिक प्रतिज्ञा’ घेण्यात आली. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात गेली ३ वर्ष सामूहिक ‘गदापूजन’ कार्यक्रम यशस्वीपणे घेण्यात येत आहेत आणि यावर्षीही हिंदुत्वनिष्ठ आणि भाविक यांचा उत्तम सहभाग यात दिसून आला.

महाकालिका देवी मंदिर येथे पू.सौ. मनिषा पाठक यांच्या हस्ते कसबा पेठ शौर्य शिबिराच्या मुलांसोबत गदापूजन झाले. केडगाव येथील हिंदुत्वनिष्ठ, स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचार मंचचे अध्यक्ष डॉ. निलेश लोणकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वतः पुढाकार घेऊन वीर सावरकर ग्रंथालय, केडगाव येथे गदा पूजन केले.खासदार प्रा (डॉ.)मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते पुण्येश्वर मारुती मंदिर येथे गदापूजन करण्यात आले.

या वेळी मारुतीस्तोत्र पठण आणि हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञाही घेण्यात आली. या ‘गदापूजना’मागील भूमिका स्पष्ट करताना हिंदु जनजागृती समितीचे पराग गोखले म्हणाले, मारुतीरायांची ‘गदा’ हे केवळ युद्धातील अस्त्र नव्हे, तर ती धर्मरक्षणाचा संकल्प, अन्यायाविरुद्ध उभे राहणे आणि भगवंताच्या कार्यासाठी अहर्निश झटण्याचे प्रतिक आहे.

आज अयोध्येत श्रीरामलल्ला विराजमान झाले आहेत, हा एक ऐतिहासिक क्षण आहे, पण श्रीरामाचे कार्य अजून अपूर्ण आहे. मंदिर उभारले, आता रामराज्य घडवण्याचे दायित्व आपल्या सर्वांवर आहे. हे कार्य हनुमानासारखे शौर्य, निष्ठा, त्याग आणि सामर्थ्य यांच्याशिवाय शक्य नाही. म्हणूनच या वर्षीही देशभरात गदापूजनाच्या माध्यमातून हिंदूंमधील शौर्य जागृत करण्याचा आणि रामराज्याच्या दिशेने सामूहिक वाटचाल करण्याचा निर्धार करायचा आहे’.

***

On the occasion of Shri Hanuman Jayanti, mass ‘Gadapujan’ program was held at 500 places across the country, and 116 places in Pune district

Gadapujan is to increase bravery and strength among Hindus – Parag Gokhale, Hindu Janajagruti Samiti

Pune: The Shri Ram Temple established in Ayodhya is in a way the beginning of Ram Rajya and now Ram Rajya should be established everywhere and to awaken bravery in Hindu society, mass ‘Gadapujan’ was performed at 500 places across the country today on the occasion of Shri Hanuman Jayanti with the participation of Hindu Janajagruti Samiti and like-minded Hindutva organizations and devotees.

In Pune district, Manchar, Vadgaon Kashimbe, Pimpalgaon Khadki, Bhukum Khatpewadi, Sadashiv Peth, Pune; Satara Road, Alandewadi, Manchar Gokarneshwar Temple, Shaniwar Wada, Sivakashinarmadeshwar Temple at Sinhagad Road, Ambegaon, Talegaon Dabhade, Sortapwadi, Hadapsar; Collective Gadapujan programs were organized at more than 116 places including Shewalwadi. In this, especially the youth participated spontaneously. 6600 people took advantage of the programs organized on this occasion.

These programs began with the blowing of the conch shell. After collective prayer, ‘Gadapujan’ ritual, Aarti of Shri Hanuman, recitation of Maruti Stotra, ‘Shri Hanumate Namah’ was chanted collectively. At this time, guidance was also given on ‘How to imbibe the qualities of Maruti Raya for the establishment of Ram Rajya’.

At the end of the program, a ‘Collective Pledge for the establishment of Ram Rajya’ was taken. Collective ‘Gadapujan’ programs have been successfully organized across the country for the last 3 years by the Hindu Janajagruti Samiti and this year too, there was a good participation of Hindu devotees and devotees.

At Mahakalika Devi Temple, Gadapujan was performed by Hon. Mrs. Manisha Pathak with the children of Kasba Peth Shaurya Shibir. Dr. Nilesh Lonkar, a Hindu patriot and president of the Swatantrya Veer Savarkar Yuva Vichar Manch in Kedgaon, and his colleagues took the initiative and performed gada pujan at Veer Savarkar Library, Kedgaon. MP Prof. (Dr.) Medha Kulkarni performed gada pujan at Punyeshwar Maruti Temple.

On this occasion, Maruti Stotra was recited and a pledge to establish a Hindu Rashtra was also taken.
Explaining the role behind this ‘gada pujan’, Parag Gokhale of Hindu Janajagruti Samiti said, Maruti Raya’s ‘gada’ is not just a weapon of war, but it is a symbol of the resolve to protect religion, stand against injustice and work tirelessly for the work of God.

Today, Shri Ram Lalla has taken residence in Ayodhya, this is a historic moment, but Shri Ram’s work is still incomplete. The temple has been built, now the responsibility of establishing Ram Rajya lies with all of us. This work is not possible without bravery, loyalty, sacrifice and strength like Hanuman. Therefore, this year too, we have decided to awaken bravery among Hindus through Gadapujan across the country and collectively move towards Ram Rajya.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *