मुंबई : राज्यात काल दिवसभरात कोरोनाचे 11 हजार 119 रुग्ण सापडले. तर 422 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. सध्या 1 लाख 56 हजार 608 अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच 9356 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 71.14 टक्के झाले आहे. राज्यभरात आतापर्यंत कोरोनाचे एकूण 4 लाख 37 हजार 870 रुग्ण बरे झाले आहेत. रायगड जिल्ह्यात मंगळवारी एकुण 255 बाधित झालेले रूग्ण आढळले तर 25 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
मंगळवारी 32 लाख 64 हजार 384 सॅम्पलपैकी 6 लाख 15 हजार 477 सॅम्पल पॉझिटिव्ह (18.85 टक्के) आले. राज्यात 11 लाख 35 हजार 749 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 38 हजार 175 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात मंगळवारी 422 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. सध्या मृत्यूदर 3.36 टक्के एवढा आहे.
राज्यभरात मंगळवारी संक्रमित आढळलेले 11,119 नविन रुग्ण आणि नोंद झालेले 422 मृत्यू यांचा तपशील पुढील प्रमाणे (कंसात मंगळवारी नोंदले गेलेले मृत्यू) : रायगड-255 (25), मुंबई मनपा-931 (49), ठाणे- 131 (4), ठाणे मनपा-164 (18), नवी मुंबई मनपा-352 (8), कल्याण डोंबिवली मनपा-212 (10), उल्हासनगर मनपा-8 (5), भिवंडी निजामपूर मनपा-9 (2), मीरा भाईंदर मनपा-151 (2), पालघर-109, वसई-विरार मनपा-155 (3), पनवेल मनपा-167 (36), नाशिक-156 (11), नाशिक मनपा-511 (5), मालेगाव मनपा-32 (1), अहमदनगर-220 (7),अहमदनगर मनपा-315 (10), धुळे-60 (2), धुळे मनपा-36 (2), जळगाव-399 (10), जळगाव मनपा-68 (1), नंदूरबार-37 (3), पुणे- 418 (16), पुणे मनपा-1267 (54), पिंपरी चिंचवड मनपा-747 (19), सोलापूर-328 (11), सोलापूर मनपा-108 (2), सातारा-353 (11), कोल्हापूर-334 (11), कोल्हापूर मनपा-137 (5), सांगली-154 (5), सांगली मिरज कुपवाड मनपा-251 (6), सिंधुदूर्ग-41 (1), रत्नागिरी-140 (3), औरंगाबाद-115,औरंगाबाद मनपा-131, जालना-63, हिंगोली-19 (2), परभणी-44 (1), परभणी मनपा-54, लातूर-81 (3), लातूर मनपा-101 (1), उस्मानाबाद-102 (4), बीड-116 (6), नांदेड-106 (2), नांदेड मनपा-151, अकोला-2 (2), अकोला मनपा-8 (1), अमरावती-51 (1), अमरावती मनपा-82 (3), यवतमाळ-73, बुलढाणा-101 (1), वाशिम-24, नागपूर-156 (7), नागपूर मनपा-656 (27), वर्धा-14, भंडारा-55, गोंदिया-24, चंद्रपूर-9 (1), चंद्रपूर मनपा-7 (1), गडचिरोली-11, इतर राज्य 7 (2).